देवघरात १ तांब्या पाणी ठेवून आरोग्यवंत आणि धनवान व्हा!

नमस्कार मंडळी आपले देवघर जेवढे सुंदर असेल तेवढे आपले घर सुंदर दिसते. देवघरात बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्या वास्तुदोष कमी करण्यासाठी आपल्याला मदत करत असतात. घरामध्ये आपण बऱ्याच अशा काही गोष्टी करत असतो ज्या मुळे आपल्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. त्यासाठी आपणास आपल्या देवघरा मध्ये अशा काही वस्तू ठेवायच्या आहेत की ज्यामुळे आपल्या घरातील प्रखर वास्तुदोष निघून जातील व घरात सुख आणि समृद्धीचे आगमन होईल. अशी एक वस्तू म्हणजे मंगल कलश. तुम्ही कुठेही राहत असाला तरी मंगल कलश हा देवघरात असायलाच पाहिजे. त्यामुळे ब्रह्मा,विष्णू आणि महेश या देवांचा वास आपल्या घरामध्ये राहत असतो आणि त्यामुळे बरीच सकारात्मक ऊर्जा घरा मध्ये येत असते.

देवघरात १ तांब्या पाणी ठेवून

आणखी एक महत्त्वाची वस्तू म्हणजे पाण्याने भरलेला स्टीलचा तांब्या. एक तांब्या पाण्याने भरून आपल्या देवघरात ठेवला तर काय होते? या तांब्याभर पाण्याचं नंतर काय करायचं? ते आज आपण पाहणार आहोत.

देवघरात कोणत्या धातूचा तांब्या(कलश) ठेवावा.

अनेकांना प्रश्न पडतो की देवघरात कोणत्या धातूचा तांब्या घेऊन त्यात पाणी भरावे? पाणी भरण्यासाठी कोणत्याही धातूचा तांब्या तुम्ही घेऊ शकता. तांब्या पितळेच,चांदीचा किंवा स्टीलचा कोणत्याही धातूचा असला तरी चालेल. ते शक्य नसल्यास साधारण बाजारात मिळणारी वाटी लोटी तुम्ही घेऊ शकता. पण लक्षात ठेवा हे जे पाणी आपण घेणार आहोत ते झाकनाने झाकूनच ठेवायचे आहे.असे केल्याने काय होणार? असा प्रश्न आपल्याला पडतो.

तांब्या(कलश) महत्व.

सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी आपण रोज सकाळी देवाची पूजा अर्चना करत असतो. स्वामींची पुस्तके वाचत असतो. परंतु नकळत आपल्या एखाद्या कृत्या मधून नकारात्मकता येत असते. आपण कितीही प्रयत्न केले तरी घरामध्ये नकारात्मकता ही येत असतेच. ही नकारात्मकता शोषून घेण्याचे काम तांब्यातील पाणी करत असते. त्यामुळे आपण नक्कीच देवघरामध्ये तांब्या भरून पाणी ठेवायला हव. आपल्या घरामध्ये कधी कुणीही येत,आपल्याला माहीत नसतं की कोणाची नजर आपल्या घरा विषयी कशी आहे. कोण आपल्या घराविषयी काय विचार करतो. पण आपण जेव्हा तांब्याभरून पाणी ठेवतो ना त्यावेळी हे पाणी समोरून येणारी नकारात्मक शक्ती खेचून घेत असते. ज्याच्या मुळे आपल्या घराला नजर दोष किंवा बाधा लागत नाहीत.

तांब्या मध्ये भरून ठेवलेल्या पाण्याचे काय करायचे.

आता हे पाणी रोज सकाळी बदलायचं का तर हो रोज सकाळी देवपूजा करताना नवीन पाणी तांब्यात भरून घ्यायचे आहे . अभिमंत्रित झालेले जुने पाणी आपल्या घरात टॉयलेट बाथरूम वगळता इतरत्र शिंपडायचे आहे किंवा घरातील इतर व्यक्तींनी त्याचे तीर्थ म्हणून प्राशन करायचे आहे . काही पाणी उरले असेल तर ते झाडांना ही घालू शकता. रोज सकाळी पूजा करताना देवघर नीटनेटके प्रसन्न ठेवा. पूजा करण्या अगोदर पाण्याचा तांब्या व देवघरातील इतर वस्तू स्वच्छ धुऊन घ्या. त्यांना हळद कुंकू व फुले वहा जेणेकरून प्रसन्नता वाढेल .

देवघरात तांब्या(कलश) ठेवल्याने काय फायदे होतात.

ज्यांनी आपल्या देवघरात ह्या गोष्टींची अजून सुरुवात केली नसेल त्यांनी जरूर करावी.जेणे करून  वास्तुदोष निघून जातील, भांडण-चिडचिड,नजर बाधा यापासून आपल्या घराची मुक्तता होईल. या नकारात्मक गोष्टीं पासून घराचे संरक्षण होईल.एकंदर घरात सकारात्मक ऊर्जा येऊन प्रसन्नता वाढेल. सर्व समस्या पासून मुक्तता मिळेल .घरात कधीही धन कमी पडणार नाही..  सर्व आर्थिक समस्या दूर होतील. घरात सुख व समृद्धीचे आगमन होईल. सुख व समृद्धीचे आगमन होईल.

-:स्वामी शिकवण:-

·         उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा.

·         जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीसी भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी असा अविनाशी स्वामी माझा .

·         यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे

Read our latest blog:-https://marathiutsav.com/6-types-of-important-bathing/

face book page link:-

https://www.facebook.com/profile.php?id=100090320067387&mibextid=ZbWKwL

टीप :-

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या ब्लॉगचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी आपल्यापर्यंत पोचवले जातात. आमचा ब्लॉग हा कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खत पाणी घालत नाही. इथे शेअर होणारे लेख हे समाज माध्यमातून मिळणाऱ्या माहिती वर आधारित आहेत. हे केवळ माहिती साठी आहेत. तुम्हाला वाचायला आणखी काय आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज ही लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर ही नक्की करा धन्यवाद आमच्या यूट्यूब चैनल ची लिंक ब्लॉग मध्ये दिलेली आहे तरी आपण यूट्यूब चैनल वर जाऊन शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.

Leave a Comment