सकाळची सुरुवात नेहमी देवाच्या नामस्मरनाणे करावी. झोपेतून जागे होताच मनात स्वामींचे स्मरण करा, जेणेकरुन तुमचा दिवस सकारात्मकतेने सुरु होईल. जितके महत्त्व शास्त्रात मंत्र नामस्मरणाला आहे, तितके महत्त्व हे स्नानाला आहे. उत्तम स्वास्थ्य आणि सुंदर शरीरासाठी दररोज स्नान(Bath) करणे आवश्यक आहे. स्नान(Bath)करण्याची सर्वात योग्य वेळ सकाळची आहे.
शास्त्रामध्ये सकाळी लवकर स्नान(Bath)करण्याचे चमत्कारिक फायदे सांगण्यात आले आहेत. स्नान करताना येथे सांगण्यात आलेल्या गोष्टी लक्षात ठेवल्यास सर्व देवी-देवतांची कृपा प्राप्त होते. तसेच कुंडलीतील इतर दोषही नष्ट होतात. सकाळी लवकर स्नान(Bath)केल्यास आरोग्यदायी लाभही होतात. स्नान करताना मंत्राचा जप करत स्नान(Bath)केले तर विशेष फायदेशीर होते.
स्नानाचे प्रकार आणि फायदे…
हिंदू धर्मशास्त्रानुसार स्नानाचे वेगवेगळे प्रकार सांगण्यात आले आहेत .ते कधी, कोठे करावे आणि त्यापासून होणारे फायदे सांगण्यात आलेले आहेत.
ब्र:ह्म स्नान : Bath time 4am-5am
सकाळी-सकाळी ब्रह्म मुहूर्त म्हणजे जवळपास ४-५ वाजता देवाचे स्मरण करत केलेले स्नान ब्र:ह्म स्नान असते. ह्या वेळेत अंघोळ केल्याने मनुष्याचे शरीर निरोगी राहते. शरीर जसे शुद्ध होते तसेच मन देखील शुद्ध होते. मनात नकारात्मक विचार येत नाही. आळशीपणा न येता सर्व कामे वेळच्या वेळी होतात आणि मनुष्याला एक उत्साह येतो. नामस्मरण पूजा झाल्यामुळे मनुष्याची दैविक(सकारात्मक) शक्ती वाढते.असे स्नान करणाऱ्या व्यक्तीला कुलदैवतेची विशेष कृपा प्राप्त होते आणि जीवनात दुःखांचा सामना करावा लागत नाही.
ऋषी स्नान(Bath):
जे लोक सकाळी-सकाळी आकाशामध्ये तारे दिसत असताना स्नान करतात, त्या स्नानाला ऋषी स्नान म्हणतात.
मानव स्नान Bath time 5am-7am:
सामान्यतः जे स्नान सूर्योदयापूर्वी केले जाते त्याला मानव(मनुष्य) स्नान म्हणतात. सूर्योदयापूर्वी केलेलं स्नानच सर्वश्रेष्ठ असते. सर्वप्रथम दैनंदिन प्रात:कार्यातून निवृत्त झाल्यानंतर आंघोळ करावी. आंघोळीच्या वेळी, तर्जनी आणि अंगठ्याने पाण्यात त्रिकोणाचे चिन्ह बनवा आणि त्यात ‘ह्रीं’ लिहा. यानंतर, हात जोडून आपल्या आराध्य दैवताचे स्मरण करा. यामुळे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा राहते. तुमच्या आर्थिक समस्याही दूर होतील.
नदी स्नान /देव स्नान(tub bath):
सध्याच्या काळात बरेच लोक सूर्योदयानंतर स्नान करतात. जे लोक सूर्योदयानंतर एखाद्या नदीमध्ये स्नान करतात किंवा घरातच विभिन्न नद्यांचे नामस्मरण करत स्नान करतात, याला देव स्नान असे म्हणतात. शक्य असल्यास, आंघोळ करताना पाण्यात थोडे गंगेचे पाणी घाला. जर गंगाजल नसेल तर दररोज पाण्यात एक चिमूटभर हळद घालून स्नान(Bath)करावे. भगवान नारायण आणि देवी लक्ष्मी यावर प्रसन्न होतात आणि कुटुंबाची बरीच प्रगती होते. पैशांची आणि अन्न-धान्याची कमतरता भासत नाही.
गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वति।
नर्मदे सिन्धु कावेरी जले अस्मीन संनिधिम कुरु।।
“स्नान करताना वरील मंत्राचा उच्चार केल्यास तीर्थ स्नानाचे फळ मिळेल “
अशा प्रकारे स्नान केल्यास व्यक्तीच्या सर्व अडचणी दूर होतात.
राक्षस स्नान.(Monster Bath 8am-12am):-
सध्याच्या काळात सूर्योदयानंतर चहा-नाश्ता झाल्यानंतर बरेच लोक स्नान करतात. अशा प्रकरच्या स्नानाला राक्षस /दानव स्नान म्हणतात.
शास्त्रात दानव स्नान करण्यास मनाई आहे. त्याची वेळ ८ नंतर आहे. राक्षस आंघोळीचा काही फायदा नाही, उलट त्याचे बरेच नुकसान आहे. उदाहरणार्थ गरीबी, भूतबाधा ह्यासारख्या गोष्टी जीवनात कायम राहतात. त्याच्याकडे बर्याचदा पैशाची कमतरता असते. कुटुंबात भांडण होते. जीवनात अनेक दु:ख पहावी लागतात. म्हणूनच, आपण राक्षस स्नान(Monster Bath)घेणे टाळावे.
अभ्यंग स्नान :–
अभ्यंग स्नान ही एक शास्त्रशुद्ध संकल्पना आयुर्वेदाने कित्येक हजार वर्षांपूर्वी ग्रंथात मांडून दिली आहे. शरद ऋतू मध्ये बाहेरील हवामान हे उष्ण आणि रुक्ष झाल्याने शरीरामध्ये पित्ताचा प्रकोप होतो. उष्णतेमुळे शरीराची लाहीलाही होत, मुत्राचे प्रमाण कमी होऊन शरीरातील मल भाग हा मूत्र मार्गाने कमी आणि घामातून त्वचामार्गाने अधिक बाहेर पडतो. आयुर्वेदात त्वचा हे वाताचे स्थान सांगितले असून, स्वेद वह स्त्रोतसाच्या अधिक कर्मशीलते मुळे आणि वातावरण कोरडे झाल्याने त्वचा ही कोरडी पडायला लागते. त्यामुळे या काळात अभ्यंग म्हणजेच सर्वांगाला तेल चोळून त्वचेचा स्निग्धपणा टिकवण्यासाठी मदत होते. तेलाच्या स्निग्ध गुणामुळे हे कार्य सिद्धीस जाते.
म्हणजेच सुगंधी द्रव्यांच्या चूर्णांनी शरीराला घासणे. यामध्ये त्रिफळा, सारिवा, नागरमोथा आदी द्रव्यांचा वापर केला जातो. तेलाभ्यंगामुळे शरीरातून बाहेर पडलेल्या क्लेदाला घर्षण करून या चूर्णाच्या सहायाने घासून मोकळे करायला मदत होते. शिवाय त्वचेखाली साचलेली अनावश्यक चरबी ही कमी व्हायला मदत होते.
आयुर्वेदात वर्णन केल्याप्रमाणे रोज अभ्यंग स्नान करावे आणि शक्य नसल्यास निदान आठवड्यातून 3-4 वेळेस तरी किमान करावे. सकाळी प्रातः विधी संपवून अथवा रात्री झोपण्यापूर्वी करावे.
टीप :– वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.
Blog Link :- https://marathiutsav.com
Youtube Link:- https://youtu.be/0Yp12wKOt3Q