Swami Samarth Status
“भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” . स्वामी स्वतःच आपल्या भक्तांना आधार देतात आणि स्वामींचे हे वचन भक्तांना आजही जगण्या साठी बळ देते. अशक्य असले तरी स्वामी ते शक्य करून दाखवतात, स्वामीभक्तांचा असा ठाम विश्वास आहे. स्वामींचे हे विचार तुमचे जीवन बदलून टाकतील. मनात सतत वाईट , नकारत्मक विचार येत असतात . ज्यामुळे तुम्ही सतत दु:खी राहता. तर स्वामी समर्थांचे हे विचार जर तुम्ही वाचले तर तुमचे जीवन बदलून जाईल.
मनाला स्थिर करायचा सर्वात सोपा उपाय म्हणजे ,सर्वप्रथम शरीराला स्थिर ठेवा. जितका वेळ शरीराला स्थिर ठेवशील तितकीच ,विचारांची ग्रंथी तुटत जातील.
जीवनात अपयश आले तर घाबरून जाऊ नकोस . जसे किमती वस्तूंना सहज कोणी हात लावू शकत नाही, मजबूत दरवाजा पार करूनच त्या वस्तूंची प्राप्ती होते. प्रमाणे यशाची प्राप्ती होण्यासाठी अपयशाचा दरवाजा पार करावा लागेल.
जे माझे सच्चे भक्त आहेत, त्यांनी कधीच माझ्यावर शंका घेतली नाही आणि ज्यांनी शंका घेतली ते कधीच माझ्या ठाई सच्चे नव्हते.
Table of Contents
Toggleस्वामी समर्थ स्टेटस मराठी | swami samarth status
नेहमी शिकण्याची वृत्ती ठेव , शिकवण्याची वृत्ती असली की मतभेद सुरू होतात.
अपयश म्हणजे काय आहे रे नेमके? तू ठरवलेल्या वेळेत झाले नाही म्हणजे अपयश? मग जर हेच अपयश आहे. तर तुझ्या वेळेच्या बाहेर तुला काही मिळाले तर मग ते काय ?
विचार न करता कुठल्याही गोष्टीला होकार देऊ नकोस, तुला पटत नसेल तर नकार ही देऊ शकतोस, काही बिघडत नाही.
ध्येय पूर्ण करण्यासाठी केवळ मेहनतच कामाची नाही, तर त्या मेहनतीला किती धार आहे?,किती गती आहे ?, ह्यावर ध्येयसिद्धीची अवधी ठरते.
जीवनात एकच ध्येय विचारपूर्वक निश्चित केलं असशील, तर बाळा… सारखे बदलू नको ,इथे थोडं आळशी होऊन जा.
तुझ्या कडून दोष ,अपराध, चूक झाली असेल; तर ती फक्त स्वीकारून चालणार नाही ,तर ती सुधार. लक्षात ठेव…ज्याने आपली चूक स्वीकारली तो कधीही दुःखी राहिला नाही .
भूतकाळात घेतलेल्या निर्णयांचा जर का आता पश्चाताप होत असेल, तर नको करून घेऊ ,बाळ.. त्या काळात तेच गरजेचे होते, जे तुला योग्य वाटले.
तुझ्या कामात दडपण येत असेल आणि तुला हे जाणवले असेल,तर शांत रहा तुझ्या श्वासावर लक्ष दे अशाने तू तुझ्या मूळ शुद्धरूपात येशील.
तुझ्या अंतर्मनात कधी असा विचार आला ?आपण कोण आहोत ?कशासाठी आहोत ?आपले ध्येय काय?
तुला न पटणाऱ्या गोष्टींचा तुझ्याशी काही संबंध असेल तर ,त्याला ठामपणे विरोध कर ,पण विरोध करण्यामागचे कारण तुला ठाऊक असू दे.
जेव्हा तुझ्या दृष्टीने ;तुझ्यावर कठीण वेळ येईल, त्यावेळेस एकच वाक्य म्हण ;”ही वेळ ही टळून जाईल”
मनाला स्थिर करायचा सर्वात सोपा उपाय म्हणजे ,सर्वप्रथम शरीराला स्थिर ठेवा. जितका वेळ शरीराला स्थिर ठेवशील तितकीच ,विचारांची ग्रंथी तुटत जातील.
स्वतःच्या चुकांपासून शिकता शिकता इतरांच्या चुकांपासून ही शिकणे , हे उत्तम दर्जाचे शहाणपण आहे.
जसे पुस्तकाच्या आवरणातून त्याची गुणवत्ता ठरवता येत नाही, तसेच कोणत्याही व्यक्तीची गुणवत्ता त्याच्या शारीरिक रूपावरून कशी ठरवता येईल ?
बाळ हा संसार ,ही सृष्टी दुखदायी नाही,ह्यात माणसांच्या विचारावर ते ठरते ;जसे घराला घरपण तिथल्या राहणाऱ्या माणसावर ठरते.
जसा एखादा सोनार आपल्या परिश्रमाने अलंकार बनवतो ,ती त्त्याची कसब आहे;त्याप्रमाणे तू तुझ्या दुःखाला सुखात परिवर्तित कर ;ती तुझी कसब असेल आणि हे तुला शक्य आहे.
माझे भक्त मलाच खातात ,मलाच पितात, मलाच जगतात; नाही समजलास ? माझ्या नामाशिवाय, माझ्या आठवणी शिवाय राहू शकत नाहीत.
कोळशाच्या खाणीत गेल्यावर त्याचा रंग लागतो, तसेच कर्म केले की कर्म फळाचा रंग लागतो .
जिथे सात्विक आचार विचार आहेत; तिथले भोजन ही सात्विक आणि पवित्र असते. कारण बनवणाऱ्यांचे भाव त्यात उतरत असतात.
जे शब्द कानावर पडल्यावर तुला स्वतःला आवडत नाहीत ,ते शब्द कधीही इतरांसाठी वापरू नको.
योग्य असण्याचा अर्थ असा नाही होत की, तुझे शब्द तू इतरां कडून वधून घेशील, तू तुझ्या दृष्टीने योग्य असणे महत्त्वाचे आहे.
माणूस नेहमी मी आणि माझे या मध्येच अडकलेला असतो, पण मृत्यू नंतर यातले काही एक बरोबर येत नाही, मग जे बरोबर येतच नाही त्यात का अडकावे ?
स्वामी समर्थ मूर्ती
Shree Swami Samarth Idol Murti Statue for Mandir Puja Room Home Décor Living Room
आई-वडिलांचे कर्तव्य आहे, चांगल्या संस्काराबरोबर मुलांचे संरक्षण करणे; तसेच मुलांचे ही कर्तव्य आहे आई-वडिलांना विश्वासात घेणे, त्यांच्याशी संवाद साधने ,असे ज्या घरी पाहायला मिळते त्या घरी सगळ्या सुख सोयी नांदतात.
या भौतिक संसारात सर्वात अमूल्य म्हणजे तुझी वेळ; एकदा गेली की परत येत नाही.कितीही श्रीमंत असलास तरी विकत घेता येत नाही .आता या वेळी तू जे काही ठरवशील, तेच तुझं भविष्य ठरेल, म्हणून वर्तमान असे कर की भविष्य आपोआप चांगले होईल.