स्वयंपाक करतांना नामस्मरणाने 100% घरात कुठलीही भांडणे होणार नाहीत | How to promote positive energy

स्वयंपाक करतांना नामस्मरणाचे महत्व.

नमस्कार मैत्रिणींनो तुमचे स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो स्वयंपाक करताना कोणते नामस्मरण करावे.किंवा कोणत्या मंत्राचा जप करावा.माझ्या महिला भगिनींना नेहमी हा प्रश्न पडत असतो की आम्ही स्वयंपाक करताना मन शांत कसे ठेवावे किंवा मन प्रसन्न कसे ठेवावे? स्वयंपाक करताना कोणते नामजप करावे कोणता मंत्र म्हणावा. महिलांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पूर्णपणे ऐकून घ्यावा. तसे तर भरपूर चमत्कारिक मंत्र आहेत.ज्याचा जप आपण करू शकतो. आणि त्या जपाचा खूप प्रभाव,आपल्या स्वयंपाकावर,आपल्या परिवारावर आणि आपल्या परिवारांच्या सदस्यावर पडत असतो. एक गोष्ट लक्षात ठेवा महिला जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा तिचे मन नेहमी शांत,प्रसन्न आणि आनंदी राहायला पाहिजे.

स्वयंपाक करताना महिला शांत व आनंदी नसेल तेव्हा त्या स्वयंपाकाची निगेटिव्ह एनर्जी त्या स्वयंपाकात उतरत असते. घरातील सदस्य जेव्हा ते भोजन करतात तेव्हा त्यांच्यात ती निगेटिव्ह एनर्जी उतरत असते. त्यामुळे घरातील शांतता जाते. घरात शांतता नसते,प्रसन्नता नसते,आनंद नसतो आणि म्हणून महिलांनी आपल्या मनातील विचार नाहीसे करण्यासाठी,मनाची शांतता ठेवण्यासाठी,मन प्रसन्न, आनंदी ठेवण्यासाठी देवाचे नाम स्मरण करावे.

स्वयंपाक करतांना नामस्मरणाने 100% घरात कुठलीही भांडणे होणार नाहीत | How to promote positive energy in kitchen

पूर्वी चूल हे अग्नी कुंड असायचं. कुटुंबात प्रचंड सासुरवास असायचा. एकत्र कुटुंब पद्धती असताना, स्वयंपाक करता-करता त्या भगिनी हळूच चुलीमध्ये सासूला दुर्लक्ष करून, सासूच दुर्लक्ष झाले की हळूच त्या महिला तुपाची किंवा तेलाची धार चुलीमध्ये टाकायच्या. इकडे स्वयंपाक चालू तिकडे गायत्री मंत्र चालू .100% ती घर गुण्या गोविंदाने नांदायची कुठल्याही प्रकारचा वाद-विवाद अजिबात नसायचा.

तर भगिनींनो आम्ही तुम्हाला दोन असे चमत्कारिक व प्रभावी मंत्र सांगणार आहे. ज्याचा जप महिला स्वयंपाक करताना करू शकतात. आता ह्या दोन प्रभावी मंत्रामधून तुम्हाला जो सोयीस्कर वाटेल असा जप तुम्ही करू शकता. तुम्ही दोन्ही मंत्राचा जप करा तुम्हाला जो चांगला वाटेल,प्रभावी वाटेल तो तुम्ही चालू ठेवा भगिनींनो इथे पहिला मंत्र म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत असणारा स्वामींचा मंत्र .आपल्या स्वामींचा चमत्कारी मंत्र “श्री स्वामी समर्थ”. तुम्ही हळू आवाजात किंवा मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ,श्री स्वामी समर्थ असे म्हटले तरी चालते.

हा खूप प्रभावी मंत्र आहे. चमत्कारी मंत्र आहे. हा मंत्र मन प्रसन्न करतो,आनंदी करतो. त्याने जेवणात सकारात्मकता उतरते . यानंतरचा दुसरा प्रभावी मंत्र आहे “गायत्री मंत्र”. गायत्री मंत्र हाही अत्यंत शक्तिशाली मंत्र आहे.तोही तुम्हाला आनंदी प्रसन्न ठेवण्यासाठी मदत करतो. महिलांनो मी तुम्हाला दोन मंत्र सांगितले आहेत. एक तर श्री स्वामी समर्थ आणि दुसरा गायत्री मंत्र.तुम्ही दोन्ही मंत्र म्हणून बघा.आठ दिवस ही प्रक्रिया करा,ट्राय करून बघा की कोणत्या मंत्राने तुम्हाला जास्त प्रसन्न,शांत आणि आनंदी वाटते. आणि त्याच मंत्राचा जप तुम्ही कायम स्वरूपी करा.

स्वयंपाक करता-करता कणिक मळता-मळता श्री स्वामी समर्थ किंवा गायत्री मंत्र म्हटला तर घरात कुठलीही भांडणे होणार नाहीत. संपूर्ण कुटुंबात शांत व आनंदी वातावरण तयार होईल.

मंत्रांचा तुमच्या शरीरा काय परिणाम होतो?

मंत्र्यांचा तुमच्या शरीरावर काहीच परिणाम होत नाही हे म्हणणे अगदी अशास्त्रीय आणि मूर्खपणाचे आहे. परिणाम हा होतोच. मंत्रामुळे तुमच्यातील सगळी सकारात्मक ऊर्जा बाहेर येते म्हणूनच त्याला मंत्र कवच म्हणतात. मग त्यामुळे तुमच्या सभोवती एक सुरक्षा कवच तयार होते. कधी कधी तुम्हाला काही लोक भेटतात आणि तुम्हाला त्यांच्याशी बोलावेशे वाटते. तुम्हाला त्यांच्याकडून चांगले तरंग मिळतात .कधी कधी तुम्हाला असे लोक भेटतात की तुम्हाला त्यांना टाळावेसे वाटते असे का होते माहित आहे का ? एखाद्या व्यक्तीच्या सभोवतालच्या नकारात्मकतेच्या लाटा त्यांना अनाकर्षक बनवतात . मंत्र त्या अनाकर्षक तरंगांना जास्त सकारात्मक,आकर्षक बनवतात.हाच मंत्र जपण्याचा फायदा आहे.

  तुम्ही जर न्यूयॉर्क ला गेलात तर तुम्हाला अशी ठिकाणी दिसतील की जिथे लोक मंत्र जप शिकतात. लोक संध्याकाळी एक तास नामस्मरण करण्याच्या क्लासला जातात ते “ओम नमः शिवाय””ओम नमो नारायणा” “श्रीराम जय जय राम”” जय जय राम “असा जप करतात. अर्थात त्यांचे उच्चार वेगळे असतात.चीनमध्ये ते राधे राधे च्या ऐवजी लाधे लाधे म्हणतात, तैवान मध्ये 7000 ते 8000 लोक मिळून राधे गोविंद च्या ऐवजी लाधे गोविंद असे गात असतात. याने परिणाम होतो हे लोकांनी अनुभवले आहे. आणि खरच तो होतो !

टीप

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे आमच्या ब्लॉगचा उद्देश नाही.कोणत्याही अंध श्राद्धे ला खत पाणी घालत नाही . केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी, आपल्या पर्यंत पोहचवले जातात .

गुरुचरित्र पारायण करण्या मुळे काय होते ? नक्की पहा . अगदी सोप्या शब्दात नियम.

Blog Link:- https://marathiutsav.com/गुरुचरित्र-पारायण-करण्या/

Youtube Link :- https://youtu.be/qhWVho9Jrzc

|| जय जय स्वामी समर्थ ||

Leave a Comment