अक्षयतृतीया या सणाच्या दिवशी जे मिळवले जाते त्याचा कधीही क्षय होत नाही. म्हणजेच ती गोष्ट आपल्या आयुष्यात कधीही नष्ट होणार नाही. अक्षय तृतीयेला किंवा त्याआधी अशा काही वस्तू घरी आणा ज्यामुळे कधीही पैसा,सुख,समाधान यांची उणीव भासणार नाही. या दिवशी पूर्ण केलेल्या कामामुळे मानवी जीवनाला कधी न संपणारी अनुकूलता लाभते व सर्वकाही मनासारखे घडते.
आपल्या संस्कृती, परंपरामध्ये साडे तीन मुहूर्त अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहेत. त्यापैकी एक अक्षयतृतीया असल्यामुळे यालाही अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. या तिथीस जे कर्म केले जाते, हे अक्षय होते. म्हणूनच अनेक शुभकार्याची सुरुवात या तिथी पासून करतात. या दिवशी माता लक्ष्मी, प्रभू विष्णु, भगवान परशुराम यांची पूजा केली जाते. साडे तीन मुहूर्त पैकी एक असल्याने या दिवशी लोकांचा कल सोने खरेदी करण्यावर जास्त असतो.
साडे तीन मुहूर्तां पैकी एकमुहूर्त:-
१)अक्षयतृतीयेला आपण सोने किंवा नवीन वस्तू खरेदी करतो. परंतु सोने अथवा महागड्या वस्तू खरेदी करणे सर्वाना शक्य नसते .काहींची खरेदी करण्याची क्षमता नसते.परंतु यादिवशी सोन्या पेक्षा हि अतिशय मौल्यवान परंतु सहज खरेदी करता येणारी वस्तू म्हणजे माता लक्ष्मी ची मूर्ती /फोटो खरेदी करावा. यादिवशी माता लक्षमीचा फोटो घरात आणला तर देवीचा आशीर्वाद कायम स्वरूपी आपल्या घरावर राहतो.
२)या दिवशी कवडी हि वस्तू खरेदी करावी.माता लक्ष्मीची उत्पत्ती समुद्र मंथनातून झालेली आहे.त्यामुळे कवडी माता लक्ष्मीला खुप प्रिय असते.कवडी माता लक्ष्मीला स्वतःकडे आकर्षित करते.माता लक्ष्मीला अर्पण केलेली हि कवडी दुसऱ्या दिवशी लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावी .तेजोरी नेहमी पैशानी भरलेली राहील.
३)शक्य असल्यास अक्षयतृतीयेला सोने चांदी या मौल्यवान वस्तू खरेदी कराव्यात.कारण या वस्तू आपल्याकडे दीर्घकाळ टिकतात.त्यामुळे आपल्या कडे एक प्रकारे संपत्ती टिकून राहते.
४)अक्षयतृतीयेला ज्यांना सोने खरेदी करता येत नाही.अशा लोकांनी जव खरेदी करावे. भगवान श्री विष्णूंना हे जव अर्पण करून दुसऱ्या दिवशी लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावे,धन वाढत जाते.
५)घरात श्रीयंत्र ठेवणे हे खूप शुभ आणि महत्वाचे मानले जाते.तर श्री यंत्र खरेदी साठी अक्षय तृतीय हा दिवस अत्यंत शुभ व चांगला आहे. यामुळे घरात श्री यंत्र यादिवशी खरेदी करावे. श्री यंत्र स्थापनेसाठी शुभ मुहूर्त देखील या दिवशी आहे.
६)दैव योगाने तुम्हाला जर या दिवशी एक डोळा असलेला नारळ मिळाला तर तो खुप मोठा शुभ संकेत ठरेल. हाच नारळ घरात स्थापन केला तर लक्ष्मीची अखंड कृपा राहील.
७)अक्षयतृतीयेला मातीचा माठ खरेदी करावा.त्यात पाणी भरून पिण्यास या दिवसापासून सुरवात करावी. असे हिंदू धर्म शास्त्र सांगते.यामुळे पितृदोष कायम चे नष्ट होतात व सुखसमृदी प्राप्तही होते.
८) अक्षयतृतीयेला भांडी खरेदी करावी.पितळ, तांबे या धातूंपासून बनलेली भांडी खरेदी करणे.अधिक लाभदायक असते.खरेदी केलेली भांडी घरी आणताना ती रिकामी न आणता त्यात धान्य भरून आणावे. म्हणजे घरात धान्य कधी कमी पडत नाही.
९) अक्षयतृतीयेला मोती शंख खरेदी करावा त्यांची छोटी खाणी पूजा करून लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवा याने घरात बरकत येते.
अक्षयतृतीयेला काय दान करावे ?
या दिवशी केलेल्या दानाला खूप महत्त्व आहे. या दिवशी तूप,साखर,तृणधान्य,फळे,भाजीपाला,,वस्त्र,सोने, चांदी आणि इतर वस्तूंचे दान करण्यास प्रोत्साहन दिले जाते. वैशाख महिना हा अत्यंत उष्ण असतो. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मातीचे माठ किंवा रांजण दान करावे. मातीच्या माठातील पाणी आरोग्यासाठी उत्तम राहते. ह्या दिवशी लोकांना गोड पदार्थ खाऊ घालावे आणि शितल पाणी प्यायला द्यावे. उन्हाळ्यापासून बचावासाठी गरजूंना छत्री पंखा दान करावा. मंदिरात किंवा सार्वजनिक स्थळी प्याऊ किंवा वॉटर कुलर लावण्याची व्यवस्था करावी. भंडारा करून गोडा-धोडाचे जेवण द्यावे. याने अनंत पुण्य मिळते. अक्षय तृतीयेला प्रभू विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करावी. पिवळे वस्त्र धारण करून तुपाचे नऊ दिवे लावून पूजा करावी.
अक्षयतृतीयेचे महत्त्व:-
अक्षयतृतीयेचे महत्त्व सर्व शुभकार्यासाठी अक्षयतृतीयेचा दिवस अत्यंत अनुकूल असल्याचे दिसून येते. हा दिवस विवाहासाठी शुभ समजला जातो, या दिवशी विवाह करणाऱ्यांच्या वैवाहिक जीवनातील पती-पत्नी मधील प्रेम कधीही संपत नाही. या दिवशी नवीन घर घेण,गाडी घेणे ही शुभ कामे केली जातात.नवीन व्यवसाय सुरू करणे आणि नवीन उपक्रमांची सुरुवात करणे देखील शुभ मानले जाते. या दिवशी व्यवसाय किंवा इतर प्रयत्न सुरू केल्याने व्यक्तीची नेहमी प्रगती होते आणि अनुकूल परिणामांसह त्याची संपत्ती दिवसें दिवस वाढत जाते.
साडेतीन मुहूर्तांपैकी
एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया
या सणाच्या निमित्ताने
आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच प्रार्थना
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
टीप :-
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे आमच्या ब्लॉगचा उद्देश नाही.कोणत्याही अंध श्राद्धे ला खत पाणी घालत नाही . केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी, आपल्या पर्यंत पोहचवले जातात .
Blog Link :- https://marathiutsav.com/6-types-of-important-bathing/
Facebook page :- https://www.facebook.com