श्री स्वामीसमर्थ,कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात.असं वाटतं की खरच देव आहे का ? इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा इथूनच स्वामी लीला सुरू होते. इथूनच खरा खेळ सुरू होतो. फक्त आपला विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते बाळ हवेत ही असतं. ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो,कोणी आहे.जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामीवर हवा.कधी कधी वाटतं हे कसं शक्य होईल ? लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात काहीही अशक्य नाही. स्वामीसमर्थ तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा विश्वास पाहिजे.
फक्त तुमचा विश्वास पाहिजे:-
कोणत्या ना कोणत्या कारणास्तव आपली प्रगती थांबली असेल.यश मिळत नसेल तर अध्यात्मिक उपाय म्हणून रोज एकदा.आणि गुरुवारी तीन वेळा स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणावा व सोबतच सर्व नीट व्हावे अशी प्रार्थना करावी. स्वामीसमर्थां चे नामस्मरण करावे. स्वामी वर विश्वास ठेवावा.
मंत्राचा काय परिणाम होतो:-
मंत्राचा तुमच्या शरीरावर काहीच परिणाम होत नाही असे म्हणणे अगदी अशास्त्रीय आणि मूर्खपणाचे आहे. परिणाम हा होतोच. मंत्रामुळे तुमच्यातील सगळी सकारात्मक ऊर्जा बाहेर येते. मग त्यामुळे तुमच्या सभोवती एक सुरक्षा कवच तयार होते. कधी कधी तुम्हाला चांगले लोक भेटतात आणि तुम्हाला त्यांच्याशी बोलावेसे वाटते. तुम्हाला त्यांच्याकडून चांगले तरंग मिळतात.कधी कधी तुम्हाला असे लोक भेटतात की तुम्हाला त्यांना टाळावेसे वाटते असे का होते माहित आहे का ? व्यक्तीच्या भोवतालचे नकारात्मक तरंग त्यांना अनाकर्षक बनवतात . मंत्र त्या अनाकर्षक तरंगांना जास्त सकारात्मक,आकर्षक बनवतात.हाच मंत्र जपण्याचा फायदा आहे.
तुम्ही जर न्यूयॉर्क ला गेलात तर तुम्हाला अशी ठिकाणी दिसतील की जिथे लोक मंत्र जप शिकतात. लोक संध्याकाळी एक तास नामस्मरण करण्याच्या क्लासला जातात ते “ओम नमः शिवाय”ओम नमो नारायणा” “श्रीराम जय जय राम” जय जय राम “असा जप करतात. अर्थात त्यांचे उच्चार वेगळे असतात.चीनमध्ये ते राधे राधे च्या ऐवजी लाधे लाधे म्हणतात, तैवान मध्ये 7000 ते 8000 लोक मिळून राधे गोविंद च्या ऐवजी लाधे गोविंद असे गात असतात. याने परिणाम होतो हे लोकांनी अनुभवले आहे. आणि खरच तो होतो !
स्वामीसमर्थांचा प्रकटकाळ:-
“सबसे बडा गुरू… गुरूसे बडा गुरू का ध्यास… और उससे भी बडे श्री स्वामी समर्थ महाराज..”
अशा शब्दां मधे स्वामीसमर्थांची महती वर्णन केली जाते.
श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे ३०० वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोड्या त्याच कर्दळीवनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवा समोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली; तेच अक्कलकोटचे स्वामीसमर्थ महाराज होते.
आपल्या हातून ह्या महापुरुषाला जखम झाली ह्या विचाराने उद्धवाला दुःख झाले व भय वाटू लागले; पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले. गंगातीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी, प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले.
दिक्क्षा:-
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज ह्यांना दीक्षा दिली. त्यानंतर स्वामीसमर्थ पंढरपूर, मोहोळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे नामक गावास स्वामींसमर्थांनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले. भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळ्यावेगळ्या पद्धतींनी दुःखमुक्त करून कार्यरत केले. श्री सद्गुरू रामानंद बिडकर महाराज यांना सुद्धा स्वामींसमर्थांची दीक्षा मिळाली आहे. ते फार मोठे शिष्य होऊन गेले आहे.
इसवी सन १८५६ मध्ये स्वामीसमर्थ महाराजांनी अक्कलकोट मध्ये प्रवेश केला व तिथल्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले.
अवतार कार्य समाप्ती:-
स्वामींसमर्थांनी अनेकांना कामाला लावून इसवी सन १८७८ मध्ये त्यांचा एक आविष्कार संपविला अशी लीला केली.स्वामीसमर्थ महाराजांचे अवतार कार्य आजही सुरू आहे. स्वामींनी अवतार कार्य संपवलेले नाही. स्वामीसमर्थ महाराज आजदेखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत आहेत व अनंत काळपर्यंत करीत राहतील.
स्वामीसमर्थ महाराजांनी त्यांच्या भक्तांना अभयदान दिले आहे,
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे…!
टीप :-
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे आमच्या ब्लॉगचा उद्देश नाही.कोणत्याही अंध श्राद्धे ला खत पाणी घालत नाही . केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी, आपल्या पर्यंत पोहचवले जातात .
आज पण श्री स्वामी महाराज जो-जो भेटेल त्याचा उद्धार अनेक मार्गातुन करत आहे.
Website link:-https://marathiutsav.com/अक्षयतृतीयेला-akshaya-tritiya-2023/
Youtube link:- https://youtu.be/zFeVh_TZT4w