अन्नपूर्णा,मात्र अन्नदाता नव्हे, संपूर्ण संसाराचे संरक्षक-स्वामींचे 1 रूप! | Shri Swami Samarth Annapurna Avatar important

श्री स्वामीसमर्थ महाराज त्यांच्या भक्तांसाठी असंख्य रूपे धारण करतात. हे आपल्या सर्वाना माहित आहे. स्वामीनी आपल्या भक्तांसाठी अन्नपूर्णा देवीचे रूप धारण केले होते. जसे कि स्वामींच्या अन्नपूर्णा स्वरूपाचे पूजन ठिक ठिकाणी केले जाते. मित्रांनो, आपण या स्थानी घडलेल्या सगळ्या घटनाच्या विस्तारात जाण्याचा प्रयत्न करूया. स्वामी समर्थ महाराज यांची लीला अगाध असल्याचा अनुभव अनेक भक्तांना   झाला आहे. आजच्या काळातही स्वामींचे अनुभव हजारों लोक पाहतात. स्वामी महाराज दयाळू होतांना त्यांचे कृत्य त्यांच्या भक्तांच्या मनात उभे राहते. स्वामी महाराजांनी अनेक भक्तांना मदत केली आहे आणि ते जाणून घेण्यासाठी अनेक कथा आहेत.

अन्नपूर्णा

त्यांच्या अनेक कथातुन दिसून येते कि स्वामी समर्थ महाराज त्यांच्या भक्तांना ते कधीही एकटे सोडून देत नाहीत. ‘भिऊ नकोस मी तुमच्या पाठीशी आहे’ असा त्यांचा मंत्र आहे हा केवळ विश्वाचा मंत्र नसून खुद्द श्रीस्वामी समर्थ महाराजांची गूढ लीला आहे, अशी अनेकांची धारणा झाली आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची अगाध लीला अनेकांना आवडते. आजच्या काळातही स्वामींच्या लीला हजारों लोक अनुभवत असतात.

अन्नपूर्णा देवीचा अवतार स्वामींनी घेतला .

ज्या अन्नपूर्णा देवीचा अवतार स्वामींनी घेतला आहे, ती माता पार्वती देवीचा अवतार मानली जाते. भारतीय संस्कृतीक परंपरांच्या अनुसार घरातील सर्वांना पोटभर अन्न खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीलाच अन्नपूर्णा मानली जाते.अक्लकोटच्या स्वामी समर्थ महाराजांनी अशाच एका प्रसंगी सेवेकऱ्यांना प्रसाद भोजन दिले. कोन्हाळे गावातील जंगलातून फिरत असताना स्वामींसोबत सुमारे शंभर सेवक श्रीपाद भट होते. दिवसभर चालून चालून त्या सर्वांना भूक लागली असल्याचं प्रत्यक्ष अनुभव झाला. थोड्या  वेळानंतर स्वामी एका शेतात जाऊन बसले असल्याचा संदेश मिळाला.

तेव्हा खुद्द स्वामी आलेले असताना, शेतकऱ्यांनी स्वामींना फळे अर्पण केली. स्वामींनी फळे घेतली, पण इतरांच्या जेवणाची सोय काय? हा सर्वाना प्रश्न पडला. एवढ्यात स्वामी सर्वाना म्हणाले, त्या आम्रवृक्षाखाली जा. श्रीपाद भटांसोबत आलेल्या सेवकाला वाटले की तिथे कोणीतरी भोजन देईल.

श्रीपाद भटाना मात्र स्वामींवर पूर्ण श्रद्धा होती. श्रीपाद भट काही सेवकांना घेऊन आंब्याच्या झाडाकडे काही न बोलता चालत गेले. तिथे आनंदी चेहऱ्याने एक म्हातारी सुहाशिनी उभी होती. त्यांनी चौकशी केल्यावर त्या बाई म्हणाल्या की आज आमच्या कडे अनेकजण इथे जेवायला येणार आहेत. पण ते अजून आले नाहीत.

सूर्यास्त होत आलेला आहे, आता कोणी येईल असं वाटत नाही. त्यामुळे आपण सर्वांनी हे जेवण करून घ्या, त्या वृद्ध सुहासिनी म्हणाल्या. तिने स्वयंपाकात बनवले सर्व जेवण श्रीपाद भटांना दिले. श्रीपाद भट आणि इतर सेवेकरी हे सर्व जेवण घेवून स्वामींच्या दिशेने निघाले. श्रीपाद भटांनी स्वामींचे दर्शन करून घेण्याचा त्या सुहासनीं महिलेस आग्रह केला.मात्र तुम्ही पुढे चला.मी मागून दर्शनाला येते. असे  सांगून त्यांनी श्रीपाद भटांना आगाऊ पाठवून दिले. श्रीपाद भटांनी सर्व सेवेकरांना जेवण वाढविण्याची विनंती केली.

सर्वांची तृप्ती झाली, अशारितीने स्वामी समर्थ महाराजांनी अन्नपूर्णा देवीचा अवतार घेऊन सर्व सेवेकऱ्यांची ची भूक संतुष्ट केली.जे भाग्यवान आहेत ते अन्नपूर्णा मातेचे स्वतःच्या डोळ्यांनी दर्शन घेतात. त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची अन्नपूर्णेच्या रूपाने सर्वत्र पूजा होऊ लागली. त्यामुळे, स्वामी आपल्या भक्तांसाठी कोणत्याही रूपाने नेहमीच मदत करतात हे बघण्यासारखं आहे.

अवतार लीला महत्व

त्यामुळे, जेव्हा आपल्या स्वामींवर आपला भक्कम विश्वास असतो तेव्हा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाचे दुःख, समस्या, प्रश्न आणि सर्व काही हे स्वामींना माहित असते आणि आपण स्वामींची शरण घेऊ शकतो.

त्यांच्या रोजच्या सेवेला मनापासून योगदान द्या. सर्वात महत्वाचं असं म्हणजे, “स्वामींचा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.” ह्या अभिवचनाचे ध्यान ठेवून संकटामुळे घाबरू नका कारण तुमच्याकडे हा स्वामी माझ्या पाठीशी आहे.मला भिती नाही की मी चुकीचा आहे, कारण हा ब्रमाडाचा नायक माझ्या सोबत आहे तुमचे मन मोकळे होईल असे म्हणून सदैव भगवंताचे नाव स्मरण करत रहा. नामस्मरणा ने, समस्यांचे समाधान मिळते आणि त्या सुधरतात. प्रारंभापासून समस्त प्रारब्धाची तीव्रता कमी होते, जीवनात प्रेम भाव निर्माण होतो आणि वास्तविकता शुद्ध होते. घरामध्ये सात्विकता वाढते आणि संसारातील अडचणी कमी होतात. घरात ईश्वराचा वास राहतो, निराशेत जाणे आणि भय राहत नाही.

जीवनात संकटांचे सामोरे जाता येते आणि स्वभावामध्ये बदल होतो. सद्गुरुंचा कृपा आशीर्वाद आपल्या साधनेत सतत असतो आणि त्यांच्या सेवेने तुमची गरजा कमी होते. आपल्या सत्वगुणांमध्ये जलद गतीने बदल होतो. अखंड अनुसंधानात भगवंताची भेट होते आणि नामस्मरणामुळे सुख मिळतो. तेवढे फायदे आपल्याला फक्त नामस्मरणाने मिळतात.

श्री स्वामी समर्थ!

टीप :-

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे आमच्या ब्लॉगचा उद्देश नाही.कोणत्याही अंध श्राद्धे ला खत पाणी घालत नाही . केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी, आपल्या पर्यंत पोहचवले जातात .

YouTube channel link :-https://youtube.com/@Motivationandstoryteller

Website link :-https://marathiutsav.com/अक्षयतृतीयेला-akshaya-tritiya-2023

Leave a Comment