महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता मिळणार वर्षाला १२००० हजार रुपये सन्मान निधी | Namoshetkari yojana 2023 Gift by Maharashtra Govt.

नमोशेतकरी महासन्मान योजनेचा लाभ कोणाला मिळणार.

जे पी एम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत. त्यांनाच ह्या योजनेचा लाभ भेटणार आहे .केंद्र सरकार  जितके पैसे शेतकरी लाभार्थ्यांना देणार आहे तेवढेच पैसे राज्य सरकार ही देणार आहे. केंद्र सरकारच्या पीएम विकास योजनेचा तेरावा हप्ता हा २७ फेब्रुवारी २०२३  रोजी जाहीर करण्यात आला आहे. ला या योजनेच्या कार्यपद्धतीनुसार पुढचा १४ वा हप्ता एप्रिल ते जुलै २०२३  दरम्यान जारी केला जाईल. आता केंद्राच्या पुढील हप्त्यातच राज्य सरकार त्यांच्या वाट्याची रक्कम टाकून शेतकऱ्यांना देणार की वेगळी काही कार्यपद्धती अवलंबणार हे मात्र योजनेचा शासन निर्णय आल्यावरच स्पष्ट होईल.

नमो शेतकरी महासन्मान योजना या योजनेचा लाभ १कोटी १५ लाख शेतकरी कुटुंबना होणार आहे. पण एकूण पाहता देशपातळीवर विचार केल्यास गेल्या काही दिवसापासून पी एम किसान सन्मान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या खालावली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर राज्यातील किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल ते पाहाव लागणार आहे .

सन्मान निधी

पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी किंवा नमो शेतकरी महासन्मान योजने च्या लाभार्थ्यांनी काय करायला हवं.

पी एम किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयांचा हप्ता ज्या बँकेत जमा होतो ते बँक खात आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक करणे बंधन कारक करण्यात आलेले आहे. राज्यात असे  १२ लाख शेतकरी आहेत ज्यांचं बँक खातं अजूनही आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक नाही.त्यामुळे शेतकऱ्यांनी ताबडतोब त्यांचा बँक खातं आधार नंबर आणि फोन नंबरशी लिंक करून घ्याव नाहीतर. त्यांना राज्य सरकारच्या योजनेचे पैसे मिळण्यासाठी अडथळे येऊ शकतात. लक्षात असू द्या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रथम प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेमध्ये लाभार्थी असावे लागेल. नवीन शेतकऱ्यांना पुढील मिळणाऱ्या चौदाव्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी लवकरच अर्ज करावा लागणार आहे.

नवीन नोंदणी

पी एम किसान सन्मान निधी योजनेत नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जा.

http://www.pmkisan.gov.in

होम पेजवर Farmer corner वर जा आणि New farmer Resister यावर क्लिक करा .यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका .कॅप्चा कोड भरा. त्यानंतर Click here to continue हा पर्याय क्लिक करा. त्यानंतर Yes वर क्लिक करून पीएम किसान नोंदणी फॉर्म 2023 भरा. फॉर्म भरल्यानंतर तो सबमिट करा. व त्याची प्रिंट घ्या.

आवश्यक कागदपत्रे

या योजनेत नोंदणी करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, जमिनीच्या सातबाराची कागदपत्रे, नागरिकत्व प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असेल. याशिवाय तुम्हाला तुमच्या बँक खात्याचा तपशील देखील द्यावा लागेल. ज्या बँक खात्या मध्ये तुम्हाला पीएम सन्मान निधी योजनेअंतर्गत पैसे मिळणार आहेत. तसेच तुम्हाला एक सक्रिय मोबाईल नंबर देखील द्यावा लागेल.  ज्यावर तुमचे मेसेज प्राप्त होतील.

लाभार्थी असल्याची स्थिती कशी तपासावी.

लाभार्थी असल्याची स्थिती कशी तपासावी ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी आधीच अर्ज केला आहे त्यांचा लाभार्थी दर्जा तपासण्यासाठी प्रथम अधिकृत पी एम  किसान पोर्टल वर जा.आणि Farmers corner वर जाऊन लाभार्थी यादी यावर क्लिक करा. तेथे तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडायचे आहे. त्यानंतर Get Report  वर क्लिक करा. या अहवालात तुम्हाला तुम्ही लाभार्थी आहात की नाही याची स्थिती कळेल.

Website Link :- https://marathiutsav.com/हे-udid-कार्ड-कसे-काढावे-त्याच

Leave a Comment