हे UDID कार्ड कसे काढावे ? त्याच्या संदर्भातली माहिती | Easy steps to make UDID Card 2023

नमस्कार मित्रहो आजची महत्त्वाची माहिती.शासन निर्णय 2016 नुसार महाराष्ट्र राज्यातील तसेच भारतातील सर्व दिव्यांग बांधवांना केंद्र स्तरावर एक शासन निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी 2016पासून सुरु आहे. ती योजना म्हणजे UDID कार्ड/ स्वावलंबन कार्ड/दिव्यांग अपंग व्यक्तींना आयडी कार्ड देण्याचा केंद्र शासनाने घेतलेला निर्णय.
UDID कार्ड
UDID कार्ड खालीलप्रमाणे अपंग व्यक्तींना अनेक फायदे मिळवून देईल: अपंग व्यक्तींना कागदपत्रांच्या एकापेक्षा जास्त प्रती बनवण्याची, देखरेख करण्याची आणि अनेक कागदपत्रे बाळगण्याची गरज नाही कारण कार्ड सर्व आवश्यक तपशील कॅप्चर करेल जे वाचकांच्या मदतीने डीकोड केले जाऊ शकतात. 
UDID कार्ड हे भविष्यात विविध फायद्यांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तींची ओळख, पडताळणीचे एकमेव दस्तऐवज असेल.
UDID कार्ड अंमलबजावणीच्या पदानुक्रमाच्या सर्व स्तरांवर लाभार्थ्यांच्या भौतिक आणि आर्थिक प्रगतीचा मागोवा घेण्यास मदत करेल.

हे UDID  कार्ड कसे काढावे त्याच्या संदर्भातली माहिती आज आपण पाहणार आहोत. UDID काढण्यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रे:आधार कार्ड, रंगीत फोटो, स्वाक्षरी नमुना/अंगठा ठसा नमुना. जुने अपंग प्रमाणपत्र असल्यास अपंग प्रमाणपत्र. मिळणारे हे कार्ड ऑनलाइन करून संबंधित जिल्ह्याच्या विभागाला जिल्हा शल्य चिकिस्तक कार्यालय या ठिकाणी जाऊन पडताळणी करून घेणे आवश्यक आहे.

चला पाहू आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते. सर्वप्रथम Google Search   मध्ये जाऊन swalancard  टाईप करायचे आहे.

https://www.swavlambancard.gov.in/

आपल्यासमोर अशा पद्धतीची वेबसाईट ओपन होईल. ओपन झाली का नाही याची खात्री करा.वेब साईट ओपन झाल्या नंतर या ठिकाणी ‘’रजिस्टर नाव’’ दिले आहे. या रजिस्टर बटणावर क्लिक करा.रजिस्टर बटणावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ऍप्लिकेन्ट चे फर्स्ट नेम विचारल आहे. त्या ठिकाणी अर्जदाराचे नाव लिहा. वडिलांचे/आईचे नाव लिहा.  आडनाव लिहा. तसेच या ठिकाणी मराठी व इंग्रजी मध्ये नाव विचारले आहे. दोन्ही भाषेत नावे लिहून घ्या. नावे टाकताना मराठी व इंग्रजी मध्ये नावे बरोबर लिहा. याच प्रमाणे वडिलांचे/आईचे आणि आडनाव टाकून घ्या .जन्मतारीख लिहा .जेणेकरून जन्मतारीख लिहली की त्याच ऑटोमॅटिक वय आपल्याला या ठिकाणी आलेलं दिसेल.

त्यानंतर या ठिकाणी मेल असेल तर मेल सिलेक्ट करा फीमेल असेल तर फिमेल सेट करा. मोबाईल नंबर बरोबर टाका जेणेकरून आपल्याला त्याच्यावर ओटीपी येईल. ई-मेल आयडी असेल तर टाका नसेल तर आवश्यकता नाही. मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन म्हणजे चेहऱ्यावरील खुणा असतील तर टाका नसेल तर आवश्यकता नाही. कास्ट टाका. स्वतःचा रक्तगट माहिती असेल तर सेट करा. लग्न झालेल आहे किंवा नाही ते सेट करा. अर्जदाराचे अपंगाशी नाते काय ते निवडा. आपण स्वतः असाल तर सेल्फ करा. आता ह्या स्टेज वर आपल्याला अपंगांचा फोटो व स्वाक्षरी नमुना(अंगठा ठसा नमुना) अपलोड करायचे आहेत. ह्या स्टेज वर आपल्याला अपंगांचा फोटो व स्वाक्षरी नमुना(अंगठा ठसा नमुना) अपलोड करायचे आहेत.

पूर्व तयारी म्हणून फोटो 100KB व स्वाक्षरी/अंगठा ठसा 30KB  ह्या पेक्षा कमी साईझ मध्ये सेट करून सेव्ह करून ठेवा.त्यासाठी तुम्ही गुगल मध्ये असणाऱ्या Resize अप्लिकेशन चा तुम्ही वापर करू शकता. Resize केल्या नंतर दोन्ही वेबसाईटवर अपलोड करून घ्या.

Address for Correspondence &Permanent address:

या ठिकाणी पत्ता टाकून घ्या. पत्ता टाकल्यानंतर पोस्ट टाकून घ्या. राज्य निवडा, जिल्हा निवडा, तहसील निवडा, गाव निवडा आणि पिन कोड सेट करून घ्या. त्या नंतर लिस्ट मध्ये दाखल्या नुसार जे डॉक्युमेंट आहेत. त्या पैकी एक इथे Resize करून,अपलोड करून घ्या. पेरमन्ट पत्ता सारखा असेल तर save as above करा. कॉलिफिकेशन टाका आणि नेक्स्ट टॅब वर क्लिक करा. तुमचं काही लिहायचं राहिल असेल तर ती माहिती लाल अक्षरांमध्ये माहिती दर्शवतात. ती माहिती व्यवस्थित असल्याची खात्री करा आणि पुढे चला.

Disability Details For UDID कार्ड :

मध्ये तुमच्या कडे डिसॅबलटी सर्टिफिकेट असेल तर Yes करा नसेल तर No करा. डिसॅबलटी सर्टिफिकेट Resize करून,अपलोड करून घ्या. नंतर डिसॅबलिटी नंबर, त्याची date of issue आणि कोणी दिलेले आहे ते लिहा. त्याखाली किती टक्के% डिसॅबलिटी आहे ते लिहा.डिसॅबलटी टाइप मध्ये तुम्हाला असणारी डिसॅबलटी,जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टरने सांगितल्या प्रमाणे निवड करा.

डिसॅबलटी कधी पासून आहे का जन्मात:आहे ते मेन्शन करा. डिसॅबलिटी एरिया म्हणजे डिसॅबलिटी कोणत्या भागाला आहे तो भाग नीवडा.

Employee Detail:

नंतर नेक्स्ट पेज वर जायचे आहे. नंतर नेक्स्ट पेज वर Employee Detail विचारले असेल. म्हणजे तो सध्या काम कुठे करतो.करतो कि नाही ,विध्यर्थी कि ,फार्मर आहे.त्यानंतर नेक्स्ट टॅब वर क्लिक करा. आधार नंबर असेल तर आधार नंबर टाका. आधार नंबर टाकल्यानंतर जो सेक्युरिटी कोड दिलेला आहे तो सेक्युरिटी कोड या ठिकाणी टाकून घ्या आणि प्रोसिड बटनावर क्लिक करा.आपल्यासमोर सविस्तर फॉर्म येईल. फॉर्म व्यवस्थित पहा आणि कन्फर्म करा. आपला फॉर्म हा सबमिट होईल.

Person with disability registration:

सबमिट केल्या नंतर आपल्याला Person with disability registration चा फॉर्म व एनरोलमेंट नंबर असलेली  पावती व दिनांक सहित उपलब्ध होईल. हा फॉर्म महत्वाचा आहे, तो जपून ठेवा त्याच्या वरील नंबर व दिनांक पुन्हा अँप्लिकेशन ट्रॅक करण्यासाठी व डाउनलोड करण्यासाठी उपयोगी आहे. दोन्ही कागदपत्र व आधार कार्ड फोटो व स्वतः अपंग व्यक्ती याना घेऊन संबंधित जिल्ह्याचे शल्य चिकिस्तक कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन पडताळणी करून घेणे आवश्यक आहे.

२०ते २५ दिवसाच्या कालावधी मध्ये रेस्ट्रेशन succes म्हणून मोबाइल मध्ये एक मसाज येतो.

आता तुम्ही ह्याच वेबसाइट मध्ये मुख्य पृष्ठा वर असणाऱ्या Track Your Application Status मध्ये जाऊन तुमचा नंबर व दिनांक टाकून तुमचे सर्टिफिकेट व कार्ड डॉनलोड करू शकता.

Website Link :- https://marathiutsav.com/नमोशेतकरी-सन्मान-निधी-namoshetkari-yojana

Leave a Comment