शासन आपल्या दारी योजना 2023 | shasan aplya dari yojana 2023 | Special scheme of maharashtra govt.

नमस्कार मित्रहो, आजच्या लेखात आपण सरकारी योजना “शासन आपल्या दारी योजना २०२३” ( Shasan Aplya Dari Yojana 2023 ) ची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्या अनुषंगाने  शासन आपल्या दारी योजने पासून मिळणारा लाभ, योजनेची उद्दिष्टे, लाभ प्रक्रिया, शासन आपल्या दारी योजना GR, शासन आपल्या दारी योजना ऑनलाइन अर्ज, ऑनलाइन नोंदणी, शासन आपल्या दारी योजने अंतर्गत कोणत्या योजना आहेत? शासन आपल्या दारी योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची आणि कार्यक्रमांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

शासन आपल्या दारी योजना 2023 | shasan aplya dari yojana

महामहिम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि महामहिम उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शना खाली महाराष्ट्र शासनाकडून ‘शासन आपल्या दारी’ ही मोहीम चालू करण्यात आलेली आहे.शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील तळागाळातील सर्व लोकांना मिळावा, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. ह्या  अभियानाची  सुरवात  नुकतीच 14 मे 2023 रोजी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका येथे करण्यात आली.राज्याच्या बहुतांश भागात राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचा मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य कार्यक्रम झाला. शासना मार्फत यावेळी २२००० लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यात आला.

शासन आपल्या दारी योजना अभियान 2023 चे उद्दिष्ट्य | Objectives of shasan aplya dari yojana

शासना मार्फत राबविण्यात येणाऱ्या अनेक कल्याणाकरी योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही अडथळ्याविना लाभ मिळावा. या उद्देशाने शासनातर्फे हाती घेण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाला नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरीतील मोठ्या संख्येने नागरिकांना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारने गेल्या 11 महिन्यांत जनहिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. तसेच ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचे काम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत असून त्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी 16,000 कार्यक्रम दूतांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिवालयात जनकल्याण कक्ष सुरु करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यांत,जिल्हा जनकल्याण कक्ष सुरु केले आहेत.

Shasan Aplya Dari Yojana

शासन आपल्या दारी योजना लाभ | shasan aplya dari yojana Benefits

  • भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक जिल्ह्यातील 27,000,000 नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
  • जिल्हा तालुका  स्थरावर यासाठी  शासनातर्फे  स्वतंत्र कक्षाची स्थापन करण्यात आली आहे.
  • कमीत कमी वेळेत विविध योजनांचे फायदे  मिळून देण्‍यासाठी प्रक्रियाही सुरू आहे.
  • नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी हे उपक्रम राबवले जातात.
  • सर्वसामान्य नागरिकांना अशा कार्यक्रमाची माहितीही नसते. या अभियाना अंतर्गत नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ घेता येईल.
  • देशातील सामान्य तळागाळातील नागरिकांनी सरकारी कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी सरकारी कार्यालयात जाणे आवश्यक असते तसेच अर्ज करण्यासाठी इतर कागदपत्रे आणि ओळखपत्रे यांची जमवाजमव करणे आवश्यक असते. या सगळ्यापासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकार ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबवत आहे.
  • या अभियानात नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली घेता येणार असून त्यासाठी लागणाऱ्या विविध कागदपत्रांची पूर्तताही करून दिली जाणार आहे.
  • जिल्ह्यात सुमारे 5 हजार 457 कोटी निधीच्या वस्तूंचे वाटप या अभियानाद्वारे करण्यात येणार आहे.
  • शासन अभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या थेट दारी येत आहे.

शासन आपल्या दारी योजना लाभ प्रक्रिया

शासनाच्या विविध कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी सरकारी अधिकारी आणि कर्मचारी एकत्र येतील.

त्याच वेळी, आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली जाईल.

ही सर्व माहिती व त्याची कागदपत्रे एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याने अर्जदारांना इतरत्र जावे लागणार नाही व प्रत्येक विभागाच्या उपक्रमांचा लाभ घेता येईल.

shasan aplya dari yojana | शासन आपल्या दारी योजना GR.

शासन आपल्या दारी अंतर्गत येणाऱ्या योजना कोणत्या? Schemes Under Shasan Aplya Dari Yojana

या उपक्रमां अंतर्गत महसूल, कृषी, शिक्षण, आरोग्य तसेच विविध महामंडळांच्या योजनांचा समावेश असणार आहे.

शासन आपल्या दारी उपक्रम आणि कार्यक्रम | shasan aplya dari yojana Activities and Programs

योजना काय काय असतील :

•             कृषी सेवा केंद्राचे परवाने

•             सेवानिवृत्त लाभ

•             आधार कार्ड

•             पॅन कार्ड

•             पासपोर्ट

•             ई-श्रम कार्ड

•             भरती मेळावा

•             पीएम किसान

•             विवाह नोंदणी

•             पीएफ घरकुल योजना

•             मनरेगा

•             जॉब कार्ड

•             मुलींना सायकल वाटप

•             नवीन मतदार नोंदणी

•             शेतकरी ते ग्राहक बाजारपेठ

•             कृषी प्रदर्शन

•             डिजिटल इंडिया

•             सखी किट वाटप

•             दिव्यांग साहित्य वाटप

अश्या वेग वेगळ्या योजनांचा यात समावेश असून, ह्याच योजना आता आपल्या दारी येणार आहेत. आणि यालाच ” शासन आपल्या दारी” योजना म्हणतात.

शासन आपल्या दारी सोबतच खालील उपक्रमांचे आयोजनही केले जाणार आहे.

  • रोजगार मेळावे
  • आरोग्य शिबिर
  • रक्तदान शिबिर
  • शेतकरी ते ग्राहक थेट बाजार

यां सोबत नवीन मतदारांची नोंदणीही या ठिकाणी केली जाणार आहे. आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी नागरिक-केंद्रित शासन प्रणाली लागू करण्यावर भर दिला आहे. हा या मोहिमेचा हा स्पष्ट उद्देश आहे. यासाठी आपण आपल्या नजीकच्या शासकीय कार्यालयाशी संपर्क साधावा आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे. हे अभियान सर्वांना घेऊन यशस्वी करायचे  आहे.

शासन आपल्या दारी योजना ऑनलाईन अर्ज Online Registration

यावर मुख्यमंत्री सचिवालयाचे पूर्ण नियंत्रण आहे. महालाभार्थी या पोर्टलवर नोंदणी करून नागरिक अनेक योजनांचा लाभ घेऊ शकतात. या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी, नागरिकाना  CSC आणि  MSCITया संस्था मधून स्वयंसेवकांची मदत घेऊन नोंदणी करता येणार आहे.

नागरिकांना ऑफलाइन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जाणार आहे.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जोड धंदे करण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्या आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे .

नेहमी विचारले जाणारे प्रश्न(FAQ):-

शासन आपल्या दारी” अभियानाचा शुभारंभ कधी झाला?

अभियानाचा नुकताच सातारा जिल्हात पाटण तालुक्यात 14 मे 2023 रोजी शुभारंभ करण्यात आला होता.

शासन आपल्या दारी योजना नोंदणी पोर्टल कोणते?

महालाभार्थी या पोर्टलवर नोंदणी करून नागरिकांना अनेक योजनांचा लाभ घेता येणार आहे.

शासन आपल्या दारी योजना 2023 नोंदणी करण्यासाठी कुठे जावे लागेल?

अभियानाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील सीएससी, ‘एमएससीआयटी’ कॉम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्समधील स्वयंसेवकांची मदत घेऊन नागरिकांना नोंदणी करता येणार आहे.

शासन आपल्या दारी योजना नोंदणी प्रक्रिया कशी असणार आहे?

नागरिकांना ऑफलाइन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जाणार आहे.

नमो शेतकरी सरकारी योजना २०२३ संपूर्ण माहिती

Leave a Comment