स्वामी समर्थ कोट्स मराठीत | Swami Samarth Quotes In Marathi

स्वामी समर्थ कोट्स |Swami Samarth Quotes -“भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” हे शब्द आठवले की स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्या समोर उभी राहते. स्वामी समर्थांचा मोठा भक्त परिवार आहे. भक्त परिवारा कडून स्वामी हे श्री दत्तगुरूंचे अवतार मानले जातात. भगवंतामध्ये तल्लीन असलेला भक्त नेहमीच संकटांतून मुक्त होऊ शकतो आणि कर्माचे फळ हे कधी ना कधी मिळतेच; असा ठाम विश्वास भक्त ठेवतो.

असे मानले जाते की कितीही संकटे आली तरी जोपर्यंत स्वामींचे पवित्र नामस्मरण केले जाईल आणि स्वामींनी शिकवलेल्या जीवनाचे सार स्मरणात राहील, तोपर्यंत हे जीवन नक्कीच सार्थकी लागेल. स्वामी समर्थांचा महिमा आणि त्यांनी अवतारात केलेले कार्य हे महान आहे. स्वामींचे हे विचार भक्तांच्या समस्यांचे निवारण करतात. असेच सदैव आपल्या पाठीशी ठामपणे उभे असणाऱ्या स्वामींचे आपल्या जीवनासाठी प्रेरणादायी ठरणारे कोट्स आपण पाहूया.

स्वामी समर्थ कोट्स मराठीत (Swami Samarth Quotes In Marathi)

उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा

यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे

जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीसी भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी असा अविनाशी स्वामी माझा

विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी.

श्री स्वामी समर्थ

जाणीव ठेव शुद्ध मनासी काय व्यर्थ बरळतो; कशाची असो भूक त्यासी? तू पुढे काय ठेवितो

– श्री स्वामी समर्थ

तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही, जी झुंझ तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.

– श्री स्वामी समर्थ

ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे .

– श्री स्वामी समर्थ

मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये .

– श्री स्वामी समर्थ

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.

– श्री स्वामी समर्थ

अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल,त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.

– श्री स्वामी समर्थ

खूप अडचणी आहेत जीवनात; परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते.

तू कोणाला फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही.

-श्रीस्वामी समर्थ

कोणत्याही साकारात्मात विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही.

– श्री स्वामी समर्थ

प्राण गेला तरीही दुस-या जीवाची हिंसा करू नये.

– श्री स्वामी समर्थ

ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही .

– श्री स्वामी समर्थ

वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका. पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका .

– श्री स्वामी समर्थ

जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठिशी आहे .

– श्री स्वामी समर्थ

मी आहे ना तुझ्या पाठिशी .

– श्री स्वामी समर्थ

शुद्ध अंतःकरण ठेऊन नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते.

– श्री स्वामी समर्थ

नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते.नामाने काळजी वाटणे नाहीसे होते. मग तळमळही आपोआप जाते .

– श्री स्वामी समर्थ

गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही .

देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. ते अडचणींना सांगी की, तुमचा देव किती मोठा आहे .

– श्री स्वामी समर्थ

कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं, आपण आपलं चांगलं काम करायचं असतं

– श्री स्वामी समर्थ

जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलेन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाऊन्स होणार नाही .

– श्री स्वामी समर्थ

फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते .

– श्री स्वामी समर्थ

विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा,त्या सबबी बनतात, सबबींवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते, चारित्र्यावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते.

– श्री स्वामी समर्थ

जेथे नाम आहे तिथे मी आहे .

– श्री स्वामी समर्थ

नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय .

– श्री स्वामी समर्थ

तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे– पुढे चालतो .

– श्री स्वामी समर्थ

जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन .

– श्री स्वामी समर्थ

तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे .

– श्री स्वामी समर्थ

संकटांना कधी कंटाळायचं नसतं त्यांना सामोरं जायचं असतं .

– श्री स्वामी समर्थ

बंधन नाही स्वामी नामाला ,
अंत नाही स्वामी कृपेला,
कुठेही कसेही घ्यावे स्वामी नाम,
राहतील स्वामी पाठीशी ठाम.

जो माझी अनान्यभावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो.

– श्री स्वामी समर्थ

आळशी माणसाचे तोंडपाहू नये.

– श्री स्वामी समर्थ

शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट रहा.

– श्री स्वामी समर्थ

जा तुझे अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग.

– श्री स्वामी समर्थ

भिऊनकोस! पुढें जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी, तुझ्यासाठी आम्ही त्यांचा प्रतिकार करू.

– श्री स्वामी समर्थ

आमचे बोलण्यावर विश्वास ठेवा,राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालावा, मोक्ष मिळेल

– श्री स्वामी समर्थ

मी सर्वत्र आहे, परंतू तुझ्यासाठी येथे आलो आता निर्धास्त राहा

– श्री स्वामी समर्थ

हम गया नही जिंदा है.

– श्री स्वामी समर्थ

अक्कलकोट निवासी श्री स्वामीसमर्थ महाराज | Shree Swami Samarth (1856-1878) | Important Of Swami Samarth Mantra

YouTube channel link :- https://www.youtube.com/@shreeswamisamarth98k

Leave a Comment