स्वामी समर्थ सुविचार

स्वामी महाराजांचे अवतार कार्य आजही सुरू आहे. स्वामींनी अवतार कार्य संपवलेले नाही. स्वामी समर्थ सुविचार च्या माध्यमातून स्वामी आजदेखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्य करीत आहेत व अनंतकाळपर्यंत करीत राहतील.

स्वामी समर्थ सुविचार कथा |Swami Samarth Quotes In Marathi

देव आणि विज्ञान

गोविंद नावाचा एक अभियंता कर्तव्यनिष्ठ आणि तेल बुद्धीचा होता. पण तो देव-देव वगैरे काहीही मानत नव्हता. त्याच्या प्रमाणे कर्तव्यच जगात सर्व काही होते. परंतु त्याची पत्नी आणि आई हे धार्मिक तसेच स्वामीभक्त होते. त्यांनी गोविंदला समजावून सांगण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी गोविंद ईश्वर भक्ती करायला तयार नसायचा.

एकदा विहीर खोदण्यासाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो. अभियंता म्हणून गोविंदलाच पूजनाचा मानकरी ठरवलं जातं. पण गोविंद पूजा-अर्चना या सर्वाला पाखंड समजतो. अश्यात तो कुदळ घेऊन जमिनीवर पहिला वार घालायला जातो. पण काय, एकदा कुदळ उचलल्यावर गोविंदला छातीत अत्यंत वेदना जाणवतात. त्याच्या हातातून कुदळ गळते.

वैद्याला लगेच बोलावले जाते. वैद्य येतात आणि गोविंदाची तपासणी करतात. वैद्य याला हृदयविकाराचा झटका सांगतात. गोविंद जेमतेम दोन ते तीन दिवसाचा सोबती आहे असं ते सांगतात. पुढे गोविंद अंथरुणालाच चिटकून राहतो. त्या कालावधीत भुजंग त्या ठिकाणी येतो आणि सांगतो की तो या गावी कीर्तन करायला आला आहे. स्वामिनी त्याला दृष्टांत देऊन सांगितलं आहे की गोविंदला घरी जाऊन निरोप दे की, त्याचा रोग ललिता-स्तोत्र वाचल्याने बरा होईल. पण गोविंद नेहमीप्रमाणे याही वेळी विश्वास न करून स्वामी वचन फेटाळून लावतो.

पण गोविंदाच्या घरातील सर्वजण स्वामींचा निरोप ऐकण्यासाठी अनेक गयावया करतात. त्यामुळे त्यांच्या आनंदासाठी गोविंद ललिता स्तोत्र वाचतो. त्याचा परिणाम म्हणून दोन-तीन दिवसांनंतर वैद्य बुवा येऊन,त्याचे निदान करून सांगतात की आता गोविंद पूर्णतः रोगमुक्त झाला आहे. हे ऐकून गोविंद थक्क होतो. स्वामीच्या वचनाची महत्ता त्याला कळते.

त्यानंतर घरातील सर्व लोक आपल्या स्वामींच्या दर्शनासाठी येतात. गोविंद म्हणतो, “स्वामी, माझा तुमच्यावर विश्वास नव्हता तरी तुम्ही मला रोगमुक्त कसे केले ?.” त्यावर स्वामी म्हणतात, “अरे, तुझा विश्वास नव्हता. पण तुझ्या परिवाराचा विश्वास तर होताना. आम्हाला आमच्या भक्तासाठी तुला बरे करावे लागले. अरे, “विज्ञानावर विश्वास चांगला आहे. पण जी गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध होत नाही; ती गोष्ट खोटी आहे; असं मानन चुकीचं आहे. खरंतर जिथे विज्ञानाचा प्रांत संपतो तिथूनच देवाचा प्रांत सुरू होतो.”

“तुझे विज्ञान सुद्धा ईश्वरानेच बनवले आहे.जसे तुमच्या सारख्या सुशिक्षित लोकांना अशिक्षित लोकांची कीव येते. तसेच आध्यात्मिक उंची गाठून ईश्वरी साक्षात्कार झालेल्या लोकांना तुमच्या सारख्या ईश्वराला नं मानणाऱ्या मूर्खांची कीव येते.”

स्वामी समर्थ  सुविचार

स्वामी समर्थ कोट्स मराठीत | Swami Samarth Quotes In Marathi

स्वामी समर्थ सुविचार कथा| Swami Samarth Quotes In Marathi

लबाडीचा परिणाम

गणपत आणि वंदना ह्या नावांचे एक जोडपं असते. त्यांचा उदरनिर्वाह दुधाच्या विक्रीवर चालायचा. त्यांच्याकडे सोना, चांदी आणि रुपा ह्या नावाच्या तीन म्हशी होत्या. त्यातली चांदी नावाची म्हैस वांझ असल्याने वंदनाच्या डोळ्यात ही म्हैस कायमची हटकायची.
एक रात्री चोर येऊन त्यांच्या तिन्ही म्हशींना घेऊन जातात. चालून चालून चोर रस्त्यात थकवा आल्यामुळे म्हशींना एका ओसाड जागेत बांधून विसाव्या करता जातात. इकडे गणपत स्वामींकडे येऊन म्हशी चोरल्या गेल्या म्हणून सांगतो. जर म्हशी मिळाल्या तर त्यातली एक म्हैस स्वामींना देऊ असा नवस करतो. स्वामी त्याला जमिनीत म्हशी कुठे आहेत हे दाखवतात. त्यानंतर गणपत जाऊन म्हशी घेऊन येतो.
पण आता नवस फेडायला जाताना, तो वांझ म्हशीला स्वामीना द्यायचं ठरवतो. असं केल्याने त्याला वाटतं, एका दगडाने दोन शिकार होतील. दुसऱ्या चांगल्या म्हशी आपल्याकडेच राहतील आणि बायकोच्या डोळ्यात खटकणारी म्हैस दिल्याने नवस पण फेडला जाईल. गणपत स्वामींकडे जाऊन वांझ म्हैस देऊन येतो.
गणपत आपल्या इतर शिल्लक म्हशीचे दूध काढतो. पण काहीही केल्याने एक थेंब सुद्धा दूध निघत नाही. त्याला कळून चुकते की स्वामींशी केलेल्या लबाडीचा हा परिणाम आहे. तो सपत्नीक स्वामींच्या चरणी शरण येतो. स्वामींना भेटून घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागतो.
स्वामी मात्र पहिली त्याची हजेरी घेतात आणि त्याला प्रबोधन करतात. स्वामी म्हणतात “अशाश्वतावर अवलंबून राहू नको, शाश्वत केवळ एक हरीणाम आहे, दत्त नाम आहे. आपला भार ईश्वरावर सोडून मोकळा हो, ईश्वर काळजी वाहील, आपल्या कर्तव्याकडे मात्र दुर्लक्ष करू नकोस”.

स्वामी समर्थ  सुविचार
स्वामी समर्थ सुविचार |Swami Samarth Quotes In Marathi

गणपत आणि वंदना यांच्या म्हशी चोरट्यांनी चोरल्याची ही कथा म्हणजे मनोरंजन, संघर्ष आणि पौराणिक संदेश यांचा संगम आहे. स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या जीवनात खूप बदल घडवून आणले. स्वामीच्या प्रेरणादायी शब्दांनी त्यांना सत्याची जाणीव करून दिली आणि त्यांच्या विचारात परिवर्तन घडवून आणले. स्वामी महाराजांचे अवतार कार्य आजही सुरू आहे. स्वामींनी अवतार कार्य संपवलेले नाही. स्वामी समर्थ महाराज आजदेखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंतकाळपर्यंत करीत राहतील. आजही श्री स्वामी समर्थ महाराज जो-जो भेटेल त्याचा उद्धार अनेक मार्गातून करत आहेत.

स्वामी समर्थ सुविचार कथा| Swami Samarth Quotes In Marathi

सद्गुरू भक्तांची काळजी घेतात.

नारायण नावाचा एक मोठे सरकारी अधिकारी होते. ते मनापासून स्वामींची भक्ती करायचे. त्यांची पत्नी, आई आणि मुलगाही धार्मिक होते, पण त्यांचा स्वामींवर अजिबात विश्वास नव्हता. त्यांच्या मते स्वामी हे मानव आहे; ते देव नाहीत.

स्वामींचे दर्शन घेऊन परतताना, स्वामींना त्यांनी भेट म्हणून आणलेली शाल द्यायची आहे; हे नारायणच्या लक्षात येते. गौराबाई ही दुसरी सुंदराबाई: ती शाल स्वामींना द्यायची म्हणून घेते, पण स्वामींना काही देत नाही. स्वामी थंडीने थरथर कापत असतात. ते गौराबाईंना नारायणाने दिलेल्या शाली बद्दल विचारतात. तेव्हा ती स्वामींना शाल आणून देते.

इकडे नारायणाला सरकारी कामासाठी रात्री गावाबाहेर जायचे असते. नारायणची आई आज किंक्रात असल्यामुळे त्यांना जाण्यापासून परावृत्त करते. तथापि, “स्वामींचे सेवक घाबरत नाहीत.” असे म्हणत नारायण बाहेर जातात.

रस्त्याने जाणाऱ्या दोन जणांनी नारायण यांना अडवले.  मारहाण करून बंडल हिसकावले. रक्ताने माखलेला नारायण जमिनीवर पडतो आणि स्वामींचा नामजप करत राहतो.

काही अंतरावरून दोन पोलीस जात असतात. एक मुस्लिम व्यक्ती त्यांच्याकडे येऊन पाठी मागे कोणाची तरी दुखापत झाल्याचे त्यांना सांगते. पण पोलिस आमच्याकडे वेळ नाही; असे सांगत पुढे जातात. काही अंतर गेल्यावर स्वामी त्यांच्याकडे प्रत्यक्ष येतात आणि त्यांना ती सूचना देतात. स्वामीचे तेज आणि रुबाब पाहून पोलिस नाही म्हणू शकले नाही आणि ते जखमी नारायणाच्या मदतीसाठी परततात. नारायणाला पाहताच पोलीस अधिकारी त्याला ओळखतात आणि घरी घेऊन येतात. डॉक्टर त्याच्यावर उपचार करतात आणि त्याची प्रकृती हळूहळू सुधारते.

 नारायणाची आई नारायणाला बडबडते की स्वामी स्वामी करून काय मिळाले? मी किंक्रात च्या दिवशी जायचे नाही म्हटले तरी, गेलास. नारायणाची अजूनही स्वामींवर श्रद्धा असते.

काही दिवसांनी तोच पोलीस अधिकारी नारायणाच्या प्रकृतीची विचारपूस करायला येतो. नारायण विचारतो की मला दुखापत झाल्याची माहिती तुम्हाला कोणी दिली? पोलिस म्हणतात; आम्हाला एका म्हाताऱ्याने सूचना दिली. नारायणाला वाटतं, स्वामींनी नक्कीच काहीतरी केलं असेल. तो त्याच्या मुलाकडून स्वामींचा फोटो मागतो आणि पोलिसांना विचारतो. हेच का ते? पोलीस अधिकारी म्हणतात हो, तेच. नारायण गहिवरून येतो. त्यांच्या कुटुंबीयांनाही स्वामींची कृपा वाटते.

पण स्वामींनी हा अपघात का टाळला नाही याचे त्यांना आश्चर्य वाटते. तेवढ्यात स्वामी तिथे प्रकट होतात.

स्वामी म्हणतात ‘’अरे तुम्हाला काय वाटलं की आम्ही मनुष्य आहे म्हणून; काही करू शकणार नाही. अरे भगवंताला कोणत्याही रूपात भक्ताची काळजी असते. नारायणाच्या नियतीत मारहाण होती, आम्ही नियती बदलत नाही पण भक्ताची त्यातून सुटका कशी करावी याचं धोरण ठरवतो “

स्वामी समर्थ  सुविचार |Swami Samarth Quotes In Marathi
स्वामी समर्थ सुविचार |Swami Samarth Quotes In Marathi

आणि

“खुद्द प्रभु श्रीरामांनी आपला वनवास चुकवायचा प्रयत्न केला नाही. नियती स्वतःच्याच कर्माने बनलेली असते; तिला चुकवता येत नाही पण त्या नियतीच्या तडाख्यातून आपल्या भक्ताला कसं सोडवावं यावरच सद्गुरूंचे लक्ष असतं”

स्वामी समर्थ  सुविचार |Swami Samarth Quotes In Marathi
स्वामी समर्थ सुविचार |Swami Samarth Quotes In Marathi

स्वामी समर्थ महाराज आजदेखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंतकाळपर्यंत करीत राहतील. आजही श्री स्वामी समर्थ महाराज जो-जो भेटेल त्याचा उद्धार अनेक मार्गातून करत आहेत.

||श्री स्वामी समर्थ||

Leave a Comment