स्वामी समर्थ सुविचार कथा (भाग १)

स्वामी समर्थ सुविचार कथा १

स्वामी समर्थ सुविचार कथा १ ​​

भक्ती निरागस आणि एकनिष्ठ असावी

      मंगला नावाची  एक गर्भवती स्त्री होती. तिचं हे तिसर बाळ होत. ती शरीराने अगदी  अशक्त झाली होती. तिचा नवरा  दिवसभर शेतात राबायचा. घराची सर्व व्यवस्था व तिची काळजी तिची दहा वर्षाची मुलगी  “गौरी” पाहायची. गौरी  अल्पवयीन असली तरी समजदार होती.  ती सकाळी उठून  झाडलोट करायची. स्वयंपाक करायची, तिने केलेली भाकरी घेऊन तिचे बाबा शेतात जायचे.  मग ती आपल्या छोट्या भावाला तयार करू, जेवण करून शाळेत सोडायची. थोडक्यात ती घराची  सर्व व्यवस्था  नीट पाहायची.

 पण या कामा मुळे गौरी फार दमायची,एक दिवस फार दमलेली असतानाच, तिला पीठ दळून स्वयंपाक करायचा होता. तिला फार झोप येत होती. ती  कळकळून स्वामी आजोबांची आठवण करते. तिला तिच्या आईने  सांगितले होते की स्वामी आजोबा आपली सर्व काळजी दूर करणार. तितक्यात तिथे एक वृद्ध आजोबा येतात ते आपली ओळख स्वामी आजोबा म्हणून करून देतात. गोष्टी-गोष्टीत आजोबा आणि गौरी सर्व पीठ दळून टाकतात. पण त्यानंतर  एकाएकी स्वामी आजोबा तिथून गौरीच्या नकळत निघून जातात.

गौरी सगळा वृत्तांत आईला सांगते. मंगलाला  वाटतं आपण मुलांना  धीर देण्यासाठी स्वामी आजोबांचं  नाव सांगितलं आणि मुलगी खरं समजली. कदाचित श्रमामुळे गौरी उगीचच मनातलं बोलली असावी. त्या नंतर गौरीला  जेव्हा ही मदत लागायची तेव्हा स्वामी आजोबा  यायचे  आणि गौरीला  मदत  करायचे. 

एकदा गौरीच्या आईला प्रसूती वेदना सुरू होतात. आधीच अशक्त असल्यामुळे हा प्रसंग मंगलला अगदी जीव घेण्यासारखा होता. सुईन-बाईने मुल अडलेल आहे म्हणून देखील सांगितले होते. पण गौरीला ठामपणे  विश्वास होता  की, तिचे आजोबा या प्रसंगातून ही तिच्या आईला आणि होणाऱ्या बाळाला सुखरूप वाचवतील. गौरी  गावभर आजोबांना शोधत  फिरते.  पण कुठेही स्वामी आजोबा तिला भेटत नाहीत. हिरमुसलेली गौरी घरी परत येते . तिथे तिची आई  सुखरूप प्रस्तुत  झाल्याचे तिला कळते. त्या स्थानावर स्वामी प्रकट होतात त्यांना पाहिल्यावर गौरी पटकन आपल्या स्वामी आजोबांना ओळखून जवळ जाते.

ती म्हणते,स्वामी आजोबा तुम्ही कुठे गेला होता ? मी गावभर शोधले तुम्हाला. त्यावर स्वामी म्हणतात अरे,मी इथेच होतो. अरे,मला तुझी काळजी दूर करायची होती. हे ऐकून गौरीचे वडील चाट पडतात. गौरी ज्या स्वामी आजोबांच्या गोष्टी सांगायची ते सर्व खरं होत.  

त्यावर स्वामी तिच्या वडिलांना म्हणतात  “अरे तुम्ही लोक दुसऱ्याला देवाचा किंवा सद्गुरु चा धीर  देता. पण स्वतःचा मात्र त्यावर विश्वास नसतो. तुमच्या मनात संकल्प-विकल्प उठतात. देवाने मदत केली तर बरं,नाहीतर आम्हीच काहीतरी करू. पण या मुलांच्या बाबतीत असं नसतं,त्यांना आमच्यावर ठामपणे विश्वास असतो. त्यांची भक्ती निरागस आणि एकनिष्ठ असते.  आणि भगवंत  अशाच भक्तीच्या दोरीने बांधला जातो. त्याला सर्व कामे टाकून भक्तांसाठी यावे लागते.  देवावर विश्वास कसा करावा हे  या लहान मुलांपासून मोठ्यांनी शिकाव.”

स्वामी समर्थ सुविचार कथा २

अंधश्रद्धा नसावी

  गावात एकदा पटकीची साथ येते.  त्यामुळे गावातील लोक स्वामीपाशी अपेक्षा घेऊन येतात.पण स्वामी काहीही उपाययोजना सांगत नाहीत.लोक पुन्हा माघारी जातात. रस्त्यात त्यांना एक तांत्रिक भेटतो. त्याने एका दगडाला शेंदूर फासलेला असतो.तो त्या दगडाला”मसोबा” म्हणून सांगतो.  त्याच्या मते म्हसोबा कोपल्या मुळेच गावात पटकीची साथ आलेली असते. तो म्हसोबाची पूजा करून  एका कोंबड्याचा बळी द्यायला सांगतो. तितक्यात स्वामी तिथे येऊन कोंबड्याला सोडून देतात.    गावकऱ्यावर स्वामी रागवतात 

“अरे जगाला उत्पन्न करणाऱ्या ईश्वराला तुम्ही त्याच्याच एका कृतीचा जीव घेऊन प्रसन्न करणार का ? दगडाला प्रसन्न करायला, जिवंत जीवाचा बळी देणार का? अरे, असा अंधविश्वास ठेवू नका.भोंदू बाबाच्या आहारी जाऊ नका. सर्व जीव ईश्वराचे लेकरू असतात. अरे लेकरूचा जीव  घेऊन जगात कोणतीही माता प्रसन्न होणार नाही. मग देव कसा प्रसन्न होणार ? आपदा मनुष्याच्या कर्मानुसार येतात.  त्यांचं निरसन करायला ईश्वर भक्ती केली पाहिजे.” स्वामी आणि गावकरी तांत्रिकाला पिटाळून देतात.  स्वामीचा क्रोध अनावर झालेला असतो. कुणीही त्यांच्याजवळ  जायला धजत नाही.  तेव्हा उपाय म्हणून सदैव भजन करणारी  सोनारीन व ढोलकी वर तिला साथ देणाऱ्या इसमाला बोलवण्यात येते. त्यांचे भजन ऐकून स्वामींच्या रागाच निरसन होतं आणि त्यांची चर्या स्मित होते.

स्वामी समर्थ सुविचार कथा ३

स्वामींचा हिरा

 स्वामींनी सर्व मौल्यवान वस्तू बाळाप्पाच्या स्वाधीन केल्या. पण सुंदराबाईंनी चोळप्पाचे कान भरले की तू एवढा जुना शिष्य आहेस  तरी नवोदित बाळाप्पावर स्वामिनीने एवढी मोठी जबाबदारी दिली आहे.चोळप्पाचे अंतर्मनातील विचार जाणून स्वामींनी त्यांना सांगितले की बाळाप्पा श्रीमंत घराण्यातील आहे आणि त्यांची भूक वेगळी आहे. म्हणूनच तो सर्व काही सोडून आमच्या सेवेसाठी आला आहे.

 चोळप्पाने स्वामींना विचारले, मग “मी प्रामाणिक नाही का?” या प्रश्नाचे उत्तर भविष्यच देईल असे स्वामी म्हणाले. एके दिवशी बाळाप्पा पैसे मोजत बसला असताना स्वामींनी त्यांना विचारले.  बाळाप्पा काय मोजताय? आपल्याकडे असा एक हिरा आहे त्याच्या तुलनेत ही सर्व संपत्ती काहीच नाही. सध्या त्या हिऱ्याला पैलू पडत आहेत. दोन-तीन दिवसांत तो आमच्याकडे येईल.

रामचंद्र नावाचा एक गृहस्थ शंकराचा निस्सीम भक्त होता. घर आणि जगाकडे दुर्लक्ष करून तो शिवभक्तीत मग्न होता. त्याच्या  आईच्या मते, कलियुगात देवाचे दर्शन होणे शक्य नाही. मात्र, रामचंद्र त्यांच्या शिवभक्तीत कोणतीही कमी पडू देत नव्हता. एके दिवशी शिवाची पूजा करत असताना दैवी-वाणी होऊन त्याला अक्कलकोटला जाण्यास सांगते. तेथे शिवाचे दर्शन होईल सांगते. रामचंद्र अक्कलकोटला येतो, चोळप्पा त्याला तिथे भेटतो. रामचंद्र आपल्या दृष्टांताबद्दल सांगतात. चोळप्पा यांनी त्याला सांगितले की, तुझे अक्कलकोट येथील स्वामींच्या दर्शनाबद्दल स्वप्न आहे. पण रामचंद्र, माझे ऐका, शिव आणि स्वामी यांच्यात काही साम्य मला दिसत नाही, म्हणून स्वामींना भेटू नका.

चोळप्पा आश्रमात येतो आणि बाळाप्पाला रामचंद्राबद्दल सांगतो. तो रामचंद्र म्हणजे स्वामींचा हिरा आहे हे बाळाप्पाच्या लगेच लक्षात येते. बाळाप्पा आणि चोळप्पा दोघेही रामचंद्राच्या प्रस्तावाची तयारी करतात. रामचंद्रही सहमत असतो पण शिवा-शिवाय कोणा पुढेही ही झुकणार नाही असे ठामपणे सांगतो.

स्वामी विचारतात, ” रामचंद्र महादेवांना भेटलात का?” रामचंद्र स्पष्टपणे नाही सांगतो. स्वामी म्हणतात माझ्याकडे लक्षपूर्वक पहा. रामचंद्र स्वामींना शिवाच्या रूपात पाहतात. वाघाची कातडी धारण केलेले, डमरू आणि त्रिशूळ, गळ्यात साप, डोक्यावर मळलेले केस आणि त्यावर चंद्र. स्वामींनी रामचंद्रांना शिवानंतर ब्रह्मा आणि विष्णूचे रूपही दाखवले. हे बघून रामचंद्र स्वामींच्या पाया पडतो आणि क्षमा मागतो. स्वामी उपदेश करतात, गुरुचं बाह्यरूप पाहू नका,  गुरूला मनाच्या डोळ्यांनी शोधा.  आम्ही तुमच्या मध्येच आहो, आपली कस्तुरी मुर्गा सारखी गत करून घेऊ नका.”

स्वामी समर्थ सुविचार कथा ४​

श्रीगुरुलीलामृत रचयीता वामनबुवांची गोष्ट

चोळप्पा  वामन बुवांची स्वामींशी  भेट घडवतात.स्वामी वामन बुवांना  म्हणतात “वामन!” इतक्या नोकऱ्या धरल्या सोडल्या आता आमची नोकरी धर.  वामन बुवा ह्याला  सहमती दर्शवतात. पुढे  एके दिवशी  वामन बुवा स्वामींकडे येऊन आपल्याला नाशिक येथील  सप्तशृंगी कुलदेवीच्या दर्शनाला जाण्यासाठी अनुमती मागतात . 

स्वामी अनुमती देतात. पण बाजूला असलेल्या बाळप्पाना म्हणतात  ह्याला  म्हणतात “काखेत कळसा  आणि गावाला वळसा.” वामन बुवा देवीच्या मंदिरात पुजाऱ्याला देवीच्या मुखातला विडा प्रसाद म्हणून मागतात.  पुजारी ह्याला स्पष्ट नकार देतो.  वामन बुवा मनो-मन प्रार्थना करतात कि “जर देवीची माझ्या कुळा वर कृपा असेल, तर देवीच्या मुखातला विडा माझ्या हातात पडेल”. इकडे स्वामी म्हणतात कि “अरे किती हट्ट करणार आणि आम्ही किती हट्ट पुरवायचे.”  बाळप्पाांनी दिलेला विडा स्वामी तोांडात घालतात आणी तिकडे देवीच्या मुखातला विडा वामन बुवाांच्या हातात पडतो. हे पाहून,पुजारी सुद्धा चकित होतो.

देवी दर्शना नंतर वामनबुवा पुढे पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जातात.तिथे पांडुरंगाच्या मूर्तीत त्याांना “स्वामी” पांडुरंगाच्या रुपात दिसतात.तीर्थयात्रा आटपून वामन बुवा स्वामी दर्शनाला येतात.स्वामी म्हणतात-” काय वामना! झाली का मनसोक्त तीर्थयात्रा? “अरे, पण तुझ्या हातात विडा आम्हालाच द्यावा लागला ना. पाांडुरांगाला जी गंगा आपण अर्पण केली ती आम्हीच ग्रहण केली ना. “अरे कशाला वण-वण फिरतो. परमानांदात रहा ” “ईश्वराच रूप नाही स्वरूप ओळखा,भक्तीची ताकद एवढी वाढवा कि भगवांताला तुमच्या कडे यायला पाहिजे.”  “देवाला हृदयात ठेवा तेव्हा तो तुम्हाला त्याच्या हृदयात  स्थान देईल.” वामन बुवा गहिवरून म्हणतात “स्वामी आपल्या लीला अगाध आहे!” “त्याांना शब्दबद्ध करुन ग्रंथ लिहू इच्छितो.” स्वामी स्मित मुद्रेनी म्हणतात “तुझी इच्छा पूर्ण होईल. माझा आशीर्वाद आहे.” पुढे वामन बुवा स्वामीलीलेंवर ग्रंथ लिहतात .हाच ग्रंथ श्रीगुरुलीलामृत म्हणून साकार होतो.

Leave a Comment