स्वामी समर्थांचे विचार: जीवनात उत्तमता कशी साधावी | 50+latest swami samarth thoughts

माणसाचे जीवन बदलणारे, जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत. स्वामी समर्थांचे विचार आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होते. स्वामींनी केलेले उपदेश आयुष्यात जर आचरणात आणले तर संसार नक्कीच सुखाचा होईल. संसाराचा पाया हा विश्वासावर असतो. पती आणि पत्नीने एकमेकांसह कसे राहावे जेणेकरून आयुष्य चांगलं राहातं.

स्वामी समर्थांचे विचार | Swami Samarthanche Vichar

स्वामी समर्थांचे विचार

काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं. पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला भाग्य लागतं’

-स्वामी समर्थांचे विचार

जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला वा पत्नीला सांगा.

जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही. पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात ,तेच एकमेकांचे साथीदार जन्मभर असतात.

-स्वामी समर्थांचे विचार

संसार म्हटलं की आपल्याला हवं असं सर्वकाही चालत नाही. कधी पतीने पत्नीसाठी तर पत्नीने पतीसाठी त्याग करणे गरजेचे असते. यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होतो. म्हणूनच ‘त्याग करा आत्मानंद मिळेल’

-स्वामी समर्थांचे विचार

मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही’, दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला. अहंकार जपला नाही तर संसार सुखाचा होईल हे नक्की.

-स्वामी समर्थांचे विचार
स्वामी समर्थांचे विचार

फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालावधी साठी प्रगती करतात,पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते.

-स्वामी समर्थांचे विचार

वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जाळून गेल्या नंतर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते.

-स्वामी समर्थांचे विचार

डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत,संकटे आल्या शिवाय डोळे उघडत नाहीत ,राग आल्यावर थोडं थांबलं आणि  चुकझाल्या वर थोडं नमलं  तर जगातील अनेक समस्या दूर होतील.

-स्वामी समर्थांचे विचार

अरे, विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही, ते खोटं आहे असं म्हणणं चुकीचं आहे.जिथे विज्ञानाची प्रांत संपते तिथून देवाची प्रांत सुरू होते. तुझं विज्ञान सुद्धा देवानेच बनवलेले आहे.

-स्वामी समर्थांचे विचार

अरे कुणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळे मिळतं, ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो म्हणून दानधर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नये.

-स्वामी समर्थांचे विचार

मनुष्याला अहंकार नसावा फक्त समाधान असाव. अरे, या अहंकारामुळेच मनुष्य ८४ लक्ष योनी फिरत राहतो. मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार नसावा.

-स्वामी समर्थांचे विचार

अ-शाश्वतावर अवलंबून राहू नको. शाश्वत केवळ हरिनाम आहे, दत्त नाम आहे. आपला भार ईश्वरावर सोडून मोकळा हो. ईश्वर काळजी वाहिल. पण आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करू नको.

-स्वामी समर्थांचे विचार

कुणावरही आंधळा विश्वास नको. जोपर्यंत आम्ही आहे,तोपर्यंत कोणीही तुमचं काही वाकड करणार नाही.

-स्वामी समर्थांचे विचार

मोहापासून सावध राहिले पाहिजे. मोह हा मोक्षाच्या वाटचाली तील फार मोठी बाधा आहे. त्याच्या आहारी गेलं तर अध:पतन निश्चित आहे !

-स्वामी समर्थांचे विचार

दुसऱ्याचं ऐका, पण आचारात आनण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला. विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा, त्याआधी आचरणात आणू नका.

-स्वामी समर्थांचे विचार

अरे, शिष्याने गुरुशी एकनिष्ठ असावं. कितीही संकट आली तरी गुरुची कास सोडू नये. संकटे पूर्वकर्मा मुळे येतात. गुरुकृपे मुळे संकटाला सामोरे जायची शक्ती मिळते व त्या संकटातून लवकर सुटका होते.

-स्वामी समर्थांचे विचार

शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे. मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे. आत्मा म्हणजेच ईश्वराचा अंश: होय.

-स्वामी समर्थांचे विचार

 आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडणे ही सुद्धा ईश्वराचीच भक्ती आहे.

-स्वामी समर्थांचे विचार

लक्षात ठेव सामर्थ्य गुरु वचनात असते. साधन म्हणून वापरलेल्या वस्तू नाही.

-स्वामी समर्थांचे विचार

आम्हाला माहित आहे तू विद्वान आहेस. पण नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही. त्याच बरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे. ज्याच्यात हे असतं, त्याच हृदय निर्मळ होते. अशा निर्मळ हृदयातच ईश्वर विसाव्यासाठी येतो.

-स्वामी समर्थांचे विचार

समाधानी राहा सुखी व्हाल

भक्ती करा मुक्ती मिळेल

ध्यान करा ज्ञान मिळेल

प्रार्थना करा प्रगती होईल

-स्वामी समर्थांचे विचार

मीपणा सोडा मोठे व्हाल

सहाय्य करा सोबत मिळेल

दान करा धन मिळेल

त्याग करा आत्मानंद मिळेल

श्रम करा सुख मिळेल

-स्वामी समर्थांचे विचार

श्री स्वामी समर्थ स्टेटस

जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ

-श्री स्वामी समर्थ स्टेटस

कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले, भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले

चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते, स्वामीचरणी मन सहज दृढ होते

क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार, स्वामी संग धरता कोण राहील निराधार

-श्री स्वामी समर्थ स्टेटस

ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ

-श्री स्वामी समर्थ स्टेटस

बंद केले नयन माझे चित्त रूप बघूनी तुझे

स्वामी तिन्ही जगाचा तू माय-बाप आहे या जनाचा

-श्री स्वामी समर्थ स्टेटस

जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव

म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव

-श्री स्वामी समर्थ स्टेटस

बंद केले नयन माझे चित्त रूप बघूनी तुझे

स्वामी तिन्ही जगाचा तू माय बाप आहे,

या जनाचा.

-श्री स्वामी समर्थ स्टेटस

एक भास  एक विसावा नित्य स्वामी दिसावा  

स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा 

हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा

-श्री स्वामी समर्थ स्टेटस

तुम्हाला  स्वतःला कळत नाही इतके

तुमच्या मनात काय आहे ते मला कळते 

नामस्मरण करताना तुम्ही मला पहात नसाल

पण मी तुम्हाला पाहतो  कारण मी तुमच्या हृदयातच आहे

-श्री स्वामी समर्थ स्टेटस

सूर्य काही बोलत नाही तर त्याचा सूर्यप्रकाश आपल्याला त्याची प्रचिती देतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका आपले कार्य करत राहा लोकंच तुमचा परिचय देतील

-श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ संदेश

दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते.

-श्री स्वामी समर्थ संदेश

आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत हे जितकं शक्य आहे,तितकंच सत्य हे ही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामीं शिवाय कोणीही नाही.

-श्री स्वामी समर्थ संदेश

मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठिशी राहीन

-श्री स्वामी समर्थ संदेश

अहंकार आणि  गैरसमजा  मुळे माणूस महत्वाच्या गोष्टी पासून दूर राहतो, गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पहाऊ देत नाही.

-श्री स्वामी समर्थ संदेश

उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा?

कधी कधी वाईट विचारांचाही करावा.

कधीतरी उपवास अहंकाराचा करावा,

कधी उपवास मीपणाचाही करावा . 

-श्री स्वामी समर्थ

जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामींची गरज असेल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी ते नक्कीच धावत येतील.

-श्री स्वामी समर्थ

तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते

-श्री स्वामी समर्थ

आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही,

तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत,

याला जास्त महत्त्व आहे.

-श्री स्वामी समर्थ

नको होऊ उदास मी आहेच तुझ्या आसपास,

डोळे बंद करून कर आठवण बघ मी आहे तुझा विश्वास

-श्री स्वामी समर्थ

असं म्हणतात की, काळजी करणारी

माणसं मिळायला भाग्य लागतं.

पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे

समजायला जास्त भाग्य लागतं.

-श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ म्हणतात ,तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांना या जगात कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही वाईट विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही.

-श्री स्वामी समर्थ

स्वामी समर्थ सुविचार

ज्या वेळी तू जाशील काळोखात,

त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ

तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात

-स्वामी समर्थ सुविचार

स्वामी माऊलींचा आधार असला की,

आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की

कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो असा अनुभव येतो.

-स्वामी समर्थ सुविचार

शुद्ध अंतःकरण ठेऊन नाम घेतले तर

भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल.

नामानेच अंतरंग शुद्ध बनते.

-स्वामी समर्थ सुविचार

या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते

ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी कि आपलं कोण आणि परकं कोण

-स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ म्हणतात,आयुष्यात नेहमी समाधानी राहा ,खूप सुखी व्हाल

-स्वामी समर्थ

तुम्हाला लागलेले कोनतेहि व्यवसन सोडा म्हणजे तुम्हला शांती मिळेल

-स्वामी समर्थ

तुमच्या हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका तर त्याच हाताने प्रामाणिकपणे कष्ट करत रहा आणि तुमच्या मुखात स्वामींचे नाम राहू द्या

-स्वामी समर्थ

मी सगळीकडे आहे. मी कणाकणात व्यापून आहे. मीच पावन आहे, मीच आहे जल , गगन हि मीच आहे. अक्काकोटातही मीच आहे,दोन्ही ध्रुवावर, कैलास पर्वतावर मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणार हि नाही . मी सदैव तुझ्या पाठिशी आहे.

-स्वामी समर्थ

किती दिवसाचे आयुष्य असते,

आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते

हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल,

हे कोणालाच माहीत नसते

-स्वामी समर्थ सुविचार

स्वामी समर्थ कोट्स मराठीत | Swami Samarth Quotes In Marathi

YouTube channel link :- https://www.youtube.com/@shreeswamisamarth98k

Leave a Comment