माझी मराठी भाषा दिन

जन्मल्या पासून आई जवळ असणारी मुले ज्या भाषेत बोलायला शिकतात तीच त्यांची मातृ भाषा .मराठी भाषा आमुची मायबोली. म्हणजे मातृभाषा,लहान मुलं जन्मल्या पासून आई जवळच असते.त्यामुळे ते ज्यभाषेत बोलते ती मुलांची बोली होणे स्वाभाविकच आहे.महाराष्ट्रची प्रत्येक प्रांताची भाषा निराळीच.ती तेथील लोकांची होते आणि ती आवडते देखील.आपली मराठी भाषा संस्कृत भाषे पासून निर्माण झाली आहे.आपली मराठी भाषा सर्व महाराष्ट्राची जरी एक असली तरी तीच दर बारा कोसावर बदलते .लेखी भाषा तीच असली तरी बोलीभाषेत फरक होतात.तिचे बोल वेगळे होतात.मराठी भाषेत सुद्धा असे वेगळे प्रकार होतात.कोकणातली कोकणी ,घाटावरची वेगळी घाटीभाषा ,वऱ्हाडीभाषा वेगळी मध्यप्रांतांतली ,मध्यप्रदेशातही हिंदी मिश्रित आणि गोवाकडील कोकणी वेगळी असते .

 मराठी भाषा  दिवस

मराठी भाषा लवचिक आहे.थोड्या-थोड्या फरकाने शब्दाचे अर्थ बदलतात.
मुंबईची मराठी भाषा हल्ली खिचडी भाषा झाली आहे .शुद्ध मराठी राहिली नाही.हिंदी मराठी इंग्रजी याची भेसळ झाली आहे.पूर्वी मराठीला राज्य भाषेचा मान नव्हता. पण आता काही प्रमाणात आहे.
खेड्यापाड्यातली भाषा अशुद्ध आणि रांगडी असते .कशीही असो ती मराठीच म्हणून मराठी माणसाला आवडते.

मराठी भाषा आपली माय बोली .

आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान असतो . पण अलीकडे आपल्या तरुण मंडळीला इंग्रजी भाषे चे ज्यास्त आकर्षण ! त्यात त्यांचा दोष नाही. कारण त्यांचं महाविद्यालयीन आणि उच्यशिक्षण सर्व इंग्रजीतून होत असतं.पदव्या मिळवून तरुण मंडळी परदेशात उच्यशिक्षणासाठी जातात.तिथे इंग्रजी भाषाच बोलावी,लिहावी लागते.सहाजिकच त्या भाषचे संस्कार घडत असतात .त्या विकसित देशात आपल्या लोकांना द्रव्यप्राप्ती भारतातील लोकांपेक्षा जास्त प्रमाणात होते.त्यामुळे त्यांना तिकडेच
रहाणे सुखाचे होते.त्यांचे संसार तिथेच होतात.त्यांच्या मुलांना मराठी येत नाही .ती तिथलीच होतात.काहीजण तिथेच स्थायीक होतात . त्यामुळे त्या मुलांची बोली भाषा तिकडची होते.

हा विषय जरा वेगळा असला तरी मराठी भाषेवर, राहणीवर .आचार, विचारांवर खूपच फरक पडतो.त्यांचे शिक्षण हि तिकडेच होते.त्यांना मराठी संस्कृतीचा गंध राहत नाही.संस्कारही तिथलेच,त्यांना भारतीय भाषेचा अभिमान नाही.तेव्हा तुम्ही शिकून मोठे व्हा .उच्य शिक्षणसाठी परदेशात जा पण काम झाल्यावर पुन्हा मायदेशी या .परदेशातून स्वदेशात येण्या साठी सागरा प्राण तळमळला म्हणणारे स्वातंत्र्य सूर्य सावरकरयांची आठवण ठेवा.

महाराष्ट्राला आपल्या ज्ञानाचा अनुभवाचा फायदा करून द्या .परभाषा जरी अवगत झाली आणि परदेशात गेलात तरी आपल्या मराठीला विसरू नका .प्रत्येक माणसाला मराठी भाषा बोलता लिहता अली पाहिजे .आपल्या मराठीत सुद्धा खूप मोठ्या विषयावर गहन असे लेखन झाले आहे.१००० वर्षांपासून अनेक राजे,संस्थनिक ,संत,कादंबरीकार, कवी यांच्या कडून मराठी भाषेची उपासना केली जातेय .व्ही वा शिरवाडकर कवी कुसुमाग्रज हे त्यांच्या पैकी एक नाव.त्यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.

मातृभाषेचा उदो उदो करा !
महाराष्ट्राचा जयजयकार करा !
ऐक व्हा !
संघटित व्हा !

Facebook page link:-https://www.facebook.com/profile.php?id=100090320067387&mibextid=ZbWKwL

Website link:भाऊ बीज 2023 च्या परंपरा आणि महत्त्व : आधुनिक जगात  साजरी करणे

Leave a Comment