विश्वा मध्ये मानवाच्या सुखी आणि स्वास्थ्य जीवनासाठी,तसेच सृष्टी व्यवस्थितपणे कार्यरत राहण्यासाठी वेदांमध्ये “अग्निहोत्र” हा विधी सांगितला गेला आहे. मानवी शरीर व मन तसेच इतर प्राणी, वनस्पती यांना स्वास्थ्य प्रदान करणारा हा विधी जैविक ऊर्जा विज्ञानावर आधारित आहे.
अग्निहोत्र हा अत्यंत सोपा साधा आणि सर्वांना आचरणात आणण्यास सुलभ विधी आहे. स्थानिक सूर्योदय व सूर्यास्त यांच्या विशिष्ट समयी पिरॅमिड सदृश्य आकाराच्या तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यामध्ये गाईच्या व बैलाच्या गोवऱ्यापासून अग्नी प्रज्वलित करून, त्यामध्ये दोन-चार थेंब तुपाने माखलेले चिमुटभर अखंड तांदूळ, दोन मंत्रउचारसह दोन आहुती देणे याला अग्निहोत्र म्हणतात.

अग्निहोत्र आचरणाचे पाच प्रमुख नियम.
- अचूक स्थानिक सूर्योदय सूर्यास्त समयांचे पालन.
- पिरॅमिड सदृश्य विशिष्ट आकाराचे तांब्याचे अथवा मातीचे पात्र.
- गोवंशाच्या गोवऱ्या पासून तयार केलेला अग्नी.
- दोन थेंब गाईच्या तुपाने माखलेल्या दोन चिमूट अखंड तांदळाच्या दोन आहुती.
- आहुती देताना उच्चारवायचे दोन संस्कृत मंत्र.
अग्निहोत्राचे मंत्र सूर्योदय
सूर्याय स्वाहा | सूर्याय इदं न मम | ( पहिली आहुती )
प्रजापतेय स्वाहा | प्रजापतेय इदं न मम ( दुसरी आहुती )
सूर्यास्त
आग्नेय स्वाहा | आग्नेय इदं न मम | ( पहिली आहुती )
प्रजापतेय स्वाहा | प्रजापतेय इदं न मम | ( दुसरी आहुती )
संस्कृत भाषेतील हे मंत्र वेदांनी सांगितले आहेत.
हा यज्ञकेल्याने मिळणारे लाभदायक फायदे.
विश्वातील अखिल मानवाला एक आवश्यक कर्तव्य म्हणून हायज्ञ करण्या साठी आदेश केलेला आहे. तसेच त्याचे महत्व पटवून देण्यासाठी काही लाभदायक परिणाम सांगितले आहेत.
- नित्य अग्निहोत्राने घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र राहते .
- सूर्योदयाच्या अग्निहोत्राचा इष्ट परिणाम सूर्यास्तापासून व सूर्यास्ताच्या अग्निहोत्राचा इष्ट परिणाम सूर्योदयापर्यंत टिकून राहतो.
- ह्या यज्ञाच्या वातावरणाने मनावरील ताणतणाव दूर होऊन मनशांती प्रसन्नता व समाधान लाभते.
- सदर यज्ञाने आचरण आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढून स्वास्थ्य वाढते.
- ह्या यज्ञाने वातावरणात विषाणू वाढीस प्रतिबंध होतो .
- ह्या यज्ञाच्या आचरणाने मनोबल वाढते. त्यायोगे व्यसनमुक्त होण्यासाठी ते फारच उपयुक्त ठरते.
- ह्या यज्ञाच्या वातावरणाने लहान मुले शांत व समाधानी होतात. त्यांची ग्रहण शक्ती वाढून ती अधिक एकाग्रतेने अभ्यास करू शकतात. चिडचिड्या,हट्टी, मतिमंद मुलांवर अग्निहोत्र वातावरणाचा इष्ट परिणाम अनुभवास आला आहे.
- ह्या यज्ञाचे शुद्ध व औषधी तत्त्वांनी युक्त वातावरण वनस्पतींच्या व प्राण्यांच्या संवर्धनास उपयुक्त आहे. ह्या यज्ञाचे भस्म(रक्षा) आयुर्वेदानुसार औषधी गुणधर्मयुक्त आहे.
- बागेतील फळझाडे फुलझाडे व शेती यासाठी ह्या यज्ञाचे भस्म उत्तम खत म्हणून वापरता येते.
- ह्या यज्ञाचे भस्म (रक्षा) पाण्यात मिसळल्याने पाणी शुद्ध होऊन त्याची प्रत सुधारते.
- ह्या यज्ञाच्या आचरणाने अंगी नम्र वृत्ती जोपासली जाते. त्याद्वारे ध्यान, धारणा,योग,जप इ.आध्यात्मिक साधना करणे सुलभ होते. ह्या यज्ञाच्या आचरणाने कुटुंबातील सर्व सदस्य सामंजस्याने एकमेकांशी जोडले जातात.
- ह्या यज्ञाच्या आचरणाने आपण आपल्या समाजाचे एक उपयुक्त उत्तम घटक व अनुयायी बनतो .
टीप :-अधिक माहिती साठी व ह्या यज्ञाचे साहित्य मिळण्यासाठी संपर्क
वेद विज्ञान अनुसंधान संस्था.शिवपुरी.अक्कलकोट ,जिल्हा .सोलापूर ४१३२१६(महाराष्ट्र ) फोन:-०२१८१-२२०७०८
टीप :-
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे आमच्या ब्लॉगचा उद्देश नाही.आम्ही कोणत्याही अंध श्रद्धेला खत पाणी घालत नाही . केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी, आपल्या पर्यंत पोहचवले जातात .
Blog Link :- https://marathiutsav.com/देवघरात-१-तांब्या-पाणी-healthy-and-wealthy
Awesome 👌👌