चांद्रयान 3 मिशन म्हणजे काय? | chandrayaan 3 | chandrayaan mission 3 information in Marathi | chandrayaan 3 Launch Date

ISRO ने 14 जुलै 2023 रोजी चंद्रयान ३ मोहीम लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या चांद्रयान 3 मोहिमे मुळे, भारत हा जगात  चंद्रावर उतरणारा चौथा देश म्हणून ओळखला जाईल. म्हणजेच भारताची चांद्रयान 3 मोहीम यशस्वी झाल्यास, भारत चंद्रावर उतरणारा संपूर्ण जगात चौथा देश बनेल.

चांद्रयान 3

यापूर्वी चीन, अमेरिका आणि रशिया या तीनच देशांनी चंद्रावर यान यशस्वीपणे उतरवीलेले आहेत. चंद्रावर जाणारे इस्रोचे स्पेसशिप हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल, ज्या भागात अद्याप कोणतेही यान अंतराळयान अजून पोहच लेले नाही.

त्यामुळे चांद्रयान 3 हि मोहीम फक्त भारतासाठी च नाही तर पूर्ण जगातील शास्त्रज्ञान साठी खूप महत्त्वाची आहे. आपल्या देशाचे तंत्रज्ञान किती प्रगत आहे. हे दाखवण्याची ही भारताला एक मोठी उत्तम संधी मिळणार आहे.

चांद्रयान मिशन 3 कधी सुरू होईल?

चांद्रयान 3 चे काम झपाट्याने सुरू झाले आहे. Isroc ने देखील अधिकृतपणे घोषित केले आहे की चांद्रयान  14 जुलै रोजी दुपारी 2:35 वाजता प्रक्षेपित  होईल.

चांद्रयान-3 हे 23 ऑगस्ट दरम्यान चंद्रावर उतरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

चांद्रयान-3 मिशन काय आहे?

आपल्या देशाने;भारताने, अंतराळ क्षेत्रात प्रगती करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या मोहिमा केलेल्या आहेत. पहिल्या चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर, भारताकडून दुसरी चांद्रयान मोहीम उत्कृष्ट्र रीतीने राबविण्याचा प्रयत्न केला होता. पण काही तांत्रिक त्रुटींमुळे भारत या चांद्रयान-2 मोहिमेत अपयशी ठरला गेला.

चांद्रयान-2 22 जुलै 2019 रोजी प्रक्षेपित झाले, परंतु 6 सप्टेंबर 2019 रोजी चंद्रावर उतरताना लॅडर अणि रोव्हर क्रॅश झाल्यामुळे त्याला किरकोळ धक्का बसला . त्या मुळे मोहीम अयशस्वी झाली.

चांद्रयान 2 च्या अपयश नंतर आता ISRO ने चांद्रयान 3 मोहीम हाती घेतली आहे. चांद्रयान 2 मधील चुका सुधारून ,उत्तम तंत्रज्ञानाचा वापर करीत  ISRO ने ही मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोठ्या जोमाने तयारी सुरू केली आहे.

12 जुलै 2023 ते 19 जुलै 2023 दरम्यान प्रक्षेपित होणारी ही अंतराळ मोहीम चांद्रयान-3, हा चंद्रावर अंतराळ यान उतरवण्याचा भारताचा सलग दुसरा प्रयत्न असेल.

5 जुलै 2023 रोजी, ISRO ने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून जीएस एलव्ही मार्क३ ,एलव्हीएम३ ही प्रक्षेपण वाहने जोडून या वाहनासह चांद्रयान 3 च्या प्रेक्षेपणाची इस्रोने घोषणा केली आहे.

चांद्रयान 3 LVM सह का वापरले जाते?

चांद्रयान ३ मध्ये रोव्हर,लॅडर आणि प्रापलशन मोडयुल असतील, पण ते स्वतः अंतराळात जाऊ शकत नाहीत.

यासाठी, ते LVM3 च्या मदतीने प्रक्षेपित केले जातील, म्हणजेच LVM3 हे प्रक्षेपण वाहन चांद्रयान 3 च्या प्रक्षेपणात महत्त्वाची भूमिका बजावेल.

LVM3 म्हणजे काय?

LVM3 हे इस्रोसाठी एक अतिशय महत्त्वाचे प्रक्षेपण वाहन आहे. या अंतराळ यानाची उंची सुमारे 43.50 मीटर आहे आणि या अंतराळ यानाचे वजन 640 टन इतके आहे.

LVM3 लाँच व्हेईकल मध्ये आठ ते नऊ हजार किलोग्रॅम वाहून नेण्याची क्षमता असते. तसेच हे भारतातील सर्वात वजनदार प्रक्षेपण वाहन म्हणून ओळखले जाते.

LVM 3 लाँच व्हेईकल मध्ये प्रोपल्शन सिस्टीम आहे आणि तीच अंतराळयानाला पुढे घेऊन जाते.ही प्रोपल्शन सिस्टीम पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करून उपग्रहाचे वजन अवकाशात उचलण्यासाठी आवश्यक ऊर्जा निर्माण करते. ह्या उर्जे  मुळेच उपग्रह आकाशात पृथ्वीच्या कक्षे बाहेर ढकलला जातो.

चांद्रयान 3 चंद्रावर गेल्यावर काय करेल?

चांद्रयान ३ चंद्रावर उतरणार असून चंद्राच्या वातावरणावर सखोल संशोधन करणार आहे.

चांद्रयान 2 आणि चांद्रयान 3 मध्ये काय फरक आहे?

चांद्रयान 3 चांद्रयान 2 सारखेच असेल. पण चांद्रयान 3 मध्ये लॅड रोव्हर अणि प्रापलशन मोडयुल वापरणार आहे.

प्रोपेलंट शिडी मॉड्यूल चांद्रयान ३ ला आणि रोव्हर ला चंद्राच्या अगदी जवळ 100 किलोमीटरच्या कक्षेत घेऊन जाईल. त्या नंतर चांद्रयान-३ हळुवारपणे चंद्राच्या पृष्ठ भागावर उतरविले जाईल. ह्याला सॉफ्ट लँडिंग असे ही म्हणतात.

चांद्रयान 3 बरोबर आर्बिटर पाठवणार नाही, कारण चांद्रयान 2 चा आर्बिटर मदतीसाठी असेल.

चांद्रयान मिशन 3 साठी एकूण बजेट किती आहे?

चांद्रयान मिशन 3 चे बजेट 6.15 अब्ज रुपये निश्चित करण्यात आले आहे.

चांद्रयान मिशन 3 चा मुख्य उद्देश काय आहे?

चांद्रयान मिशन 3 मुख्य उद्दिष्ट प्रथम यशस्वीरित्या चंद्रावर उतरणे आणि चंद्राच्या पृष्ठभागाशी संवाद साधणाऱ्या रोव्हरच्या क्षमतेची चाचणी घेणे हा आहे.

या मिशनमध्ये अनेक महत्त्वाची नवीन वैज्ञानिक निरीक्षणे ही नोंदवली जातील.

मोहिमे दरम्यान, चंद्राच्या पृष्ठभागावरील माती, रसायने आणि इतर वातावरणातील घटकांचा अभ्यास करून चंद्रा विषयीच्या असलेल्या ज्ञानात अधिक भर घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. असे सांगितले जाते कि चांद्रयान३ मध्ये भूकमापक यंत्र ही बसवण्यात येणार आहे.

 चांद्रयान-1 आणि चांद्रयान-2 मोहिमे दरम्यान काय केले गेले?

चांद्रयान-१ मोहिमे मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचे रेणू आहेत की नाही हे शोधण्याचा प्रयत्न केला गेला होता.

चांद्रयान-2 मोहिमे मध्ये चंद्र आणि त्याच्या पर्यावरणाविषयी माहिती गोळा केली आहे.

चला तर मित्रानो येणाऱ्या  १४ जुलै रोजी दुपारी २.३५ वा चांद्रयान ३ चे प्रक्षेपण  पाहूया.

चित्त थरारक अनुभव घेऊया !

देशाच्या शिरपेचात मनाचा तुरा लागत असताना चे साक्षीदार बनूया !

हे ही बघा..

“अधिकमास” १९ वर्षा नंतर श्रावणात योग जुळून आलाय | काय करावे,काय करु नये

बॅकलिंक काय आहे | What is meaning of backlink in Marathi

डॉ.अब्दुल कलाम यांचा जीवनातील प्रेरक प्रसंग [ Dr. Abdul Kalam ]

Leave a Comment