“अधिकमास” १९ वर्षा नंतर श्रावणात योग | काय करावे,काय करु नये | Important of Adhikmass 2023

सौर वर्षाचे 365 दिवस आणि चंद्र वर्षाचे 354 दिवस दोन्ही मध्ये अकरा दिवसांचा फरक येतो .हा 11 दिवसांचा फरक संतुलित करण्यासाठी एका वर्षातील 11 असे तीन वर्षातील 33 दिवस एकत्र करून एक वेगळा महिना दर तीन वर्षांनी ग्राह्य धरला जातो. त्यास अधिकमास म्हणतात. त्याला मलमास, पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना असेही म्हणतात.

अधिकमास महिना योगायोगाने या वेळी श्रावण महिन्यात आला आहे, त्यामुळे श्रावण महिना ५९ दिवसांचा असेल. 

सर्व शुभ कार्ये श्रावण महिन्याच्या दुसऱ्या महिन्यात म्हणजेच शुद्ध श्रावण महिन्यात होतील. अधिक मास १८ जुलै ते १६ आगस्ट पर्यंत चालेल. जोतिष शास्त्रनुसार श्रावण महिन्यात जास्तीचा महिना असेल,तर या वेळी पावसाळ्यात अडथळा निर्माण होऊन लोकांच्या संपत्तीची हानी होईल असे भाकीत केले गेले आहे.

असमान्य पावसामुळे पूरस्थिती निर्माण होईल. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचा फटका शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. अधिकमास महिन्यात चंद्रसूर्यांच्या गतीत फरक पडतो. यामुळे वातावरणातही बदल होत असतो. याचा आपल्यावर शरीरावर अनिष्ट परिणाम होऊ नये म्हणून आपल्याला शक्यते नुसार काही नियम व व्रते आपल्याला पाळायची आहेत.

अधिकमास महिन्यात काय करावे:-

पहिला श्रावण मास हा अधिकमास व त्यानंतर येणारा श्रावण हा निज मास असेल. निज महिन्यात येणारे सणच साजरे करण्याची आपल्याकडे परंपरा आहे.

  •  या महिन्यात शक्य तितके धार्मिक समारंभ, विधी आणि पूजा पठण करावे.
  • स्तोत्रांचे पठण केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते, म्हणून या महिन्यात अधिकाधिक स्तोत्रांचे वाचन करावे. या महिन्यात श्रीमद्भागवत गीतेतील पुरुषोत्तम महिन्याचे महामात्य, श्री रामकथेचे पठण, विष्णु सहस्रनाम स्तोत्र आणि गीतेतील पुरुषोत्तम नावाचा चौदावा अध्याय, या सर्वांचे अर्था सहित रोज वाचन करावे.
  • जर तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामाच्या व्यस्ततेमुळे पाठ करता येत नसेल किंवा वेळ नसेल तर तुम्ही दिवसातून १०८ वेळा “ओम नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप करावा.
  • संपूर्ण महिन्यात प्रत्येक दिवशी फक्त एकदाच अन्न खाणे. हे मानसिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून फायदेशीर होऊ शकते.
  • या महिन्यात दीपदान करावे. तसेच दान आणि दक्षिणा करण्यासाठी हा महिना शुभ मानला जातो.
  • पुरुषोत्तम(अधिक) मासा मध्ये स्नान, पूजा, विधी आणि दान ही कामे करणे विशेष फळ देतात आणि आपली सर्व प्रकारच्या दुःखानं पासून मुक्तता करण्यास मदत करतात.
  • भागीदारीची कामे करणे, खटला भरणे, बियाणे लावणे, झाडे लावणे, देणगी देणे, लोककल्याणाची कामे करणे, सेवाकार्य करणे यात दोष नाही.

अधिक मास महिन्यात काय करू नये:-

  • लग्नकार्य,मुंज,साखरपुडा किंवा इतर कोणतेही शुभ या कार्य महिन्यांत करू नये. या महिन्यात विवाह,घरात प्रवेश करणे, कान टोचणे, श्राद्ध मुंडन प्रसाद यांसारखे शुभ कार्य करणे टाळावे.
  • या महिन्यात कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका आणि मांसाहार वर्ज्य करा. मांस, मध, तांदळाचा,कोंडा, उडीद,  मोहरी, मुळा, कांदा, लसूण, शिळे अन्न खाऊ नये आणि दारू पिऊ नये.
  • या महिन्यात घर, संपत्ती, कपडे, सुवर्णअलंकार, घर, दुकाने, वाहने इत्यादी मोठी आर्थिक गुंतवणुक करून ;कोणतीही नवीन वस्तू खरेदी करू नका. मात्र यादरम्यान शुभ मुहूर्त असल्यास ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार दागिने खरेदी करू शकता.
  • नवीन ठिकाणी देव दर्शनासाठी न जाता आपल्या नेहमीच्या मंदिरातून किंवा देवघरातून देवाची पूजा करावी.
  • तसेच असभ्य भाषा किंवा अपशब्द, कौटुंबिक वाद, राग, खोटे बोलणे, शारीरिक संबंध इत्यादी टाळा.
  • निष्काम अधिक महिन्यात करावे. इच्छेने काम करू नये असे शास्त्र सांगते.
  • नवीन देव प्राणप्रतिष्ठा कार्य या महिन्यात करत नाही. तथापि, ज्या देवांना बर्याच काळापासून प्रतिष्ठित केले गेले नाही ते स्थापित केले जाऊ शकतात.
  • खड्डे खोदणे, विहिरी खोदणे, बोरिंग, तलाव इ. संन्यास मान्य नाही.
  • या महिन्यात दीक्षा घेणे किंवा संन्यास घेणे मान्य नाही.
  • अधिकामासात कोणतेही व्रत सुरू किंवा चालू शकत नाही.

श्रावणी सोमवार व्रत नियोजन आणि तारीख:-

2023 मध्ये, पहिला निज श्रावणी सोमवार 21 ऑगस्ट 2023 रोजी आहे.त्यानंतर दुसरा श्रावणी सोमवार 28 ऑगस्ट 2023 रोजी, तिसरा श्रावणी सोमवार 4 सप्टेंबर 2023 रोजी आणि चौथा श्रावणी सोमवार 11 सप्टेंबर 2023 रोजी असेल. दर सोमवारी महादेवाला अर्पण केल्या जाणाऱ्या शिवामूठीचे महत्त्वही वेगळे आहे. प्रथेनुसार पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जव भगवान शंकराला अर्पण केले जातात. पाचवा श्रावणी सोमवार आल्यास शिवमूठ म्हणून सातू वाहण्याची परंपरा आहे.

राशीनुसार अधिकमासा मध्ये करा मंत्रजप:-

१९ वर्षा नंतर यंदा श्रावणात अधिक मास येण्याचा योग जुळून आला आहे. शास्त्रानुसार भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी श्रावणा पेक्षा चांगला महिना असूच शकत नाही.राशीनुसार जप केल्याने श्रावण महिन्यात भोलेनाथांच्या आशीर्वादाचा वर्षाव सुरू होतो.

  •   मेष राशी च्या लोकांनी श्रावण महिन्यातील सोमवारी “ओम नमः शिवाय” या मंत्राचा जप करावा. या राशीच्या लोकांनी शंकराला पाण्याऐवजी उसाच्या रसाने अभिषेक करावा.
  • वृषभ राशी श्रावणात प्रत्येक सोमवारी वृषभ राशीच्या लोकांनी महादेवाची पूजा करताना“ओम नागेश्वराय” या मंत्राचा जप करावा.दुधाचा अभिषेक केल्यास शुभ फळ मिळेल.
  • मिथुन राशी च्या लोकांसाठी “ओम नमः शिवाय काल महाकाल काल कृपालम ओम नमः” मंत्राचा जप करणे खूप शुभ आहे. या मुळे भगवान शंकराची कृपा होते. शिवलिंगावर दुर्वा आणि भांगाची पाने अर्पण करणे फलप्राप्त असते.
  • कर्क राशी च्या लोकांनी दर सोमवारी शिवलिंग पूजा करताना “ओम चंद्रमौलेश्वर नमः”मंत्राचा जप करावा. महादेवा च्या कृपेसाठी शिवाला खीरीचा अभिषेक करणे शुभ राहील.
  • सिंह राशी च्या लोकांनी श्रावणात प्रत्येक सोमवारी “श्री सोमेश्वराय”मंत्राचा जप करावा. महादेवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी त्यांना गंगाजलाने अभिषेक करावा.
  • कन्या राशी च्या लोकांनी भगवान शंकराची उपासना करताना “ओम नमः शिवाय काल ओम नमः”मंत्राचा जप करावा. तसेच या राशीच्या लोकांनी शिवलिंगावर ५ बेलपत्रे चढवावीत.
  • तूळ राशी च्या लोकांनी शिवपूजन करताना प्रत्येक सोमवारी “ओम श्री नीलकंठया नमः”चा जप करावा. या मंत्राचा जप केल्याने भगवान शिव सर्व कलंक दूर करतील. या राशीच्या लोकांनी महादेवाला दही अर्पण करावे.
  • वृश्चिकराशी च्या लोकांनी “ओम ओम जुन स:”या मंत्राचा जप करावा. श्रावणात सोमवारी शिवलिंगाला मधा ने अभिषेक केल्यास घरात सुख-समृद्धी येईल.
  • धनुराशी प्रत्येक सोमवारी भगवान महादेवाच्या पूजे दरम्यान “ओम नमो शिवाय गुरु देवाय नमः”चा जप करावा. यामुळे आदिशक्ती व शिव प्रसन्न होऊन  आशीर्वाद देतील. भगवान शंकराला गंगाजलाने अभिषेक करावा.
  • मकर राशी च्या लोकांनी श्रावणात दर सोमवारी “ओम नमः शिवाय”आणि “ओम त्रिनेत्रय नमः”मंत्रांचा जप करावा. शिवलिंगाला दही अर्पण करावे.
  • कुंभ राशी च्या लोकांनी महादेवाच्या पूजेच्या वेळी प्रत्येक सोमवारी “ओम इंद्रमुखाय नमः”आणि “ओम श्री सोमेश्वराय नमः”या मंत्राचा जप करावा. तसेच भगवान शंकराला बेरी अर्पण कराव्यात.
  • मीन राशी च्या लोकांनी शिव पूजे दरम्यान ओम नमो शिवाय “गुरु देवाय नमः”मंत्राचा जप करावा, यामुळे भोलेनाथ प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात.

टीप :-

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे आमच्या ब्लॉगचा उद्देश नाही.कोणत्याही अंध श्राद्धे ला खत पाणी घालत नाही . केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी, आपल्या पर्यंत पोहचवले जातात .

स्वप्नाचा अर्थ काय असतो ? | What Do Dreams Mean In Marathi | 100+ Dreams

अधिकमास | श्रावणात अधिक मास येतोय [ Shree Swami Samarth ]

Leave a Comment